घरताज्या घडामोडीमहात्मा गांधींजींचा स्वातंत्र्यलढा म्हणजे 'नाटक'- भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान

महात्मा गांधींजींचा स्वातंत्र्यलढा म्हणजे ‘नाटक’- भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान

Subscribe

वादग्रस्त विधानासाठी प्रसिद्ध असलेले माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी आता महात्मा गांधीना लक्ष्य केलं आहे. गांधीजींनी उभारलेला स्वातंत्र्य लढा हे एक नाटक होते. इंग्रजांबरोबर संगनमत करूनच सर्व आंदोलनं करण्यात आली होती असा खळबळजनक आरोप हेगडे यांनी केला आहे.

कर्नाटक येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की भारतात अशा व्यक्तीला महात्मा म्हणून संबोधले जाते ज्यांनी संपू्र्ण स्वातंत्र्यलढा इंग्रजांशी संगनमत करुन लढवला. या स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांनी एकदाही पोलिसांचा मार खाल्ला नाही. कारण इंग्रज सरकारबरोबर हातमिळवणी करूनच स्वातंत्र्यासाठी आंदोलन करण्यात येत होती. तो कधीच खरा स्वातंत्र्यलढा नव्हता. आपसातील संमतीने करण्यातआलेले ते स्वातंत्र्य आंदोलन होते. असेही हेगडे यावेळी म्हणाले.

- Advertisement -

गांधीजींचे आमरण उपोषण, सत्याग्रह हे एक नाटक होते. काँग्रेसवाले म्हणतात भारताला स्वातंत्र उपोषण आणि सत्याग्रहामुळे मिळालं आहे. पण ते खरे नसून उपोषण व सत्याग्रहामुळे इंग्रजांनी भारत सोडलेले नाही. असेही हेगडे यांनी म्हटले आहे.

यावर भाजपने मात्र सावध पवित्रा घेतला असून हेगडे यांच्या विधानाशी पक्षाचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. कर्नाटक भाजपचे प्रवक्ते जी मधुसुदन यांनी आरएसएस महात्मा गांधीचा सन्मान करत असून अशा विधानांचे कधीही समर्थन करणार नाही असे म्हटले आहे.

- Advertisement -

हेगडे यांच्या या विधानावर विरोधक आक्रमक झाले असून काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते आनंद शर्मा यांनी भाजप नेत्यावर हल्लाबोल केला आहे. दिल्लीतील निवडणुकीवेळी धुव्रीकरणाच्या माध्यमातून मत मिळवण्यासाठी भाजपचे नेते चिथावणीखोर भाषणं देत आहेत. जो देशाच्या आत्मियतेवरच घाला आहे. महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यलढ्याचा असा अपमान कोणीही करू शकत नाही. यामुळे हेगडे यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी अशी मागणी शर्मा यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -