घरदेश-विदेशVideo : १५ लाखांच्यावर भ्रष्टाचार झाल्यास तक्रार करु नका, तर... भाजप खासदाराचे...

Video : १५ लाखांच्यावर भ्रष्टाचार झाल्यास तक्रार करु नका, तर… भाजप खासदाराचे खळबळजनक वक्तव्य

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून भाजपा मंत्र्यांकडून विविध मुद्द्यांवर वादग्रस्त विधाने केली जात आहेत. अशातच मध्य प्रदेशातील पुन्हा एका भाजप खासदाराने वादग्रस्त विधान करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. मध्य प्रदेशातील भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांचा एक व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी भ्रष्टाचारावर अतिशय खळबळजनक विधान केलेय. जर एखाद्या सरपंचाने १५ लाख रुपयांच्यावर भ्रष्ट्राचार केला असेल तर त्याची तक्रार घेऊन माझ्याकडे या. त्यापेक्षा कमी पैशांचा भ्रष्टाचार केला असेल तर त्याची तक्रार घेऊन माझ्याकडे येऊ नका असं खळबळजनक विधान भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांनी केलय. रीवा येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात ते बोलत होते.

याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय. या व्हिडिओमध्ये खासदार जनार्दन मिश्रा यांनी म्हटले की, ‘सरपंच भ्रष्टाचार करतो असे आरोप लोकं करतात. यावर त्यांना मी सांगतो की, जर १५ लाखांपर्यंतचा भ्रष्टाचार केला असेल तर भाऊ माझ्याशी बोलू नको. जर १५ लाखांच्या पुढे भ्रष्टाचार करत असेल तर बोल.

- Advertisement -

जनार्दन मिश्रा इथवरचं थांबले नाहीत तर आपल्या विधानाचे समर्थन करत पुढे म्हटले की, जर सरपंचाने १५ लाखांच्यावर भ्रष्टाचार केला तर सांगा. सरपंचाचे ७ लाख रुपये तर निवडणुकीसाठी खर्च होतात. तर ७ लाख रुपये आता पुढील निवडणुकीसाठी खर्च होतील. महागाई वाढतेय तर आणखी एक लाखाची भर घाला. ही परिस्थिती आहे. हे समाजाची वस्तूस्थिती आहे. याच क्रमाने आपण पायऱ्या चढा.

- Advertisement -

जनार्दन मिश्रा विधानांमुळे चर्चेत राहतात

जनार्दन मिश्रा यापूर्वीही आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दाढीतून पंतप्रधान आवास योजनेची घरं येतात. जोपर्यंत मोदींची दाढी आहे, तोपर्यंत घरं मिळत राहतील.

यापूर्वी 2019 मध्ये मिश्रा यांनी पोलिसांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. यात त्यांनी म्हटले की, काँग्रेस किंवा पोलिसांचा कोणीही व्यक्ती शेतकऱ्यांकडून वसुली करण्यासाठी आला तर त्याचे हात तोडून टाकू, त्याला गुदमरून ठार करु. त्यामुळे भाजप खासदार जनार्दन मिश्रा नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडत आहेत.


बुलेट अन् बॉम्ब प्रूफ प्रोटेक्शन! कोट्यावधींची मर्सिडीज पंतप्रधानांच्या ताफ्यात

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -