घरदेश-विदेशजे.पी.नड्डा यांचे हॅक झालेले ट्विटर अकाऊंट पुन्हा पूर्ववत; हॅकर्सकडून ट्विटमध्ये युक्रेनचा...

जे.पी.नड्डा यांचे हॅक झालेले ट्विटर अकाऊंट पुन्हा पूर्ववत; हॅकर्सकडून ट्विटमध्ये युक्रेनचा उल्लेख

Subscribe

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचे संकट गडद होत असतानाच हॅकर्सकडून आता भारतीय नेत्यांना लक्ष केले जात आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे ट्विटर अकाऊंट आज हॅक करण्यात आले होते. नड्डा यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हॅकर्सनी रशिया आणि युक्रेन या देशांच्या मदतीसाठी क्रिप्टोकरन्सीच्या रुपात मदत करण्याचे आवाहन केले होते. दरम्यान हॅकर्सकडून मंत्री जे.पी नड्डा यांच्या ट्विटर अकाऊंटवरून सतत रशिया आणि युक्रेनच्या मदतीसाठी बिटकॉइन आणि इथेरियमची मागणी केली जात होत. एकामागोमाग एक असे तीन ते चार ट्विट हॅकर्सकडून त्यांच्या अकाऊंटवरून करण्यात आले. मात्र काही वेळातच नड्डा यांचे ट्विटर अकाऊंट पूर्ववत झाले आहे.

रशियाच्या पाठीशी उभे रहा, आता क्रिप्टोकरन्सीच्या रुपात मदत स्वीकारली जाईल, बिटकॉइन आणि इथेरियमच्या स्वरूपात मदत स्वीकारली जाईल अशी पोस्ट नड्डा यांच्या ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आली होती. यामुळे पोस्टमुळे केंद्रीय यंत्रणा देखील चक्रावल्या. यानंकप पुन्हा युक्रेनसोबत उभे राहा. क्रिप्टोकरन्सी दान करा, अशा मेसेजची पोस्ट करण्यात आली. त्या पाठोपाठ ‘माझे अकाउंट हॅक झाले नाही. सर्व दान युक्रेनच्या सरकारला दिले जाणार आहे’, असा तिसरा मेसेज त्यांच्या अकाऊंटवरून करण्यात आला. यावरून नड्डा यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचे लक्षात येताच टेक्निकल टीम करून काही वेळातच अकाउंट रिस्टोअर करण्यात आले आहे. याबाबत ट्विटरकडेही तक्रार देण्यात आली आहे.

- Advertisement -

मात्र मागील काही महिन्यांपासून देशातील बड्या राजकीय नेत्यांचे ट्विटर अकाऊंट हॅक होण्याचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान मागील वर्षी डिसेंबरमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले होते. याद्वारे हॅकर्सकडून भारताने बिटकॉइनला अधिकृतरित्या कायदेशीर मान्यता दिल्याचे ट्विट करण्यात आले होते.


नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल: दिशा सालियानबाबतचे ‘ते’ वादग्रस्त वक्तव्य भोवले

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -