घरताज्या घडामोडीनारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल: दिशा सालियानबाबतचे 'ते' वादग्रस्त...

नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल: दिशा सालियानबाबतचे ‘ते’ वादग्रस्त वक्तव्य भोवले

Subscribe

मालवणी पोलिसांनी दिशा सालियनबाबतचा अहवाल राज्य महिला आयोगाकडे सोपवला

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशा सालियनबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. केंद्रीय नारायण राणे यांनी दिशा सालियनबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत सालियन कुटुंबीयांनी मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर पत्रकार परिषदेत दिशा सालियान यांच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली, तसेच यातून ती गरोदरही होती, असा दावा केला होता. मात्र पोलिसांच्या अहवालात, दिशा सालियनच्या पोस्टमॉर्टमध्ये तिच्यावर कोणताही लैंगिक अत्याचार झाला नव्हता तसेच ती गरोदर नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पोलिसांनी हा महिला आयोगालाही सादर केला आहे. पोलिसांनी महिला आयोगाला अहवाल सादर केल्यानंतर रात्री 12 वाजता दिशा सालियनच्या कुटुंबीयांनी मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सालियनविरोधात केलेल्या या आरोपांनंतर तिच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेत यावर आक्षेप नोंदवला होता. नारायण राणे यांच्यामुळे आपल्या मुलीची बदनामी होत असून ही बदनामी करणं थांबवलं पाहिजे अन्यथा आम्ही आत्महत्या करु असा इशारा सालियन कुटुंबियांनी दिला होता. यानंतर सालियन कुटुंबियांनी मालवणी पोलिसांत राणे पिता पुत्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मालवणी पोलिसांनी दिशा सालियनबाबतचा अहवाल राज्य महिला आयोगाकडे सोपवला

दिशा सालियनबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानांचा चौकशी अहवाल मालवणी पोलिसांनी राज्य महिला आयोगाकडे सोपवला आहे. दरम्यान दिवंगत दिशा सालियनची बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले होते. तिच्या शवविच्छेदन अहवालानुसार तिच्यावर बलात्कार झालेला नसून ती गरोदर सुद्धा नव्हती हे मालवणी पोलिसांनी राज्य महिला आयोगाला दिलेल्या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे, अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून दिली आहे.

- Advertisement -

चाकणकर यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले की, “मृत्यूपश्चात देखील होत असलेल्या आपल्या मुलीच्या बदनामीमुळे व्यथित झालेल्या दिशा सालियनच्या आई वडिलांनी या संदर्भात दिशाच्या मृत्यूबाबत खोटी व बदनामीकारक माहिती देणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे व संबंधित सर्व व्यक्तींवर कारवाई करावी करण्याची मागणी केली होती.”

“तसेच दिशाबद्दल समाजमाध्यमावर नमूद असलेली चुकीची व बदनामीकारक माहिती काढून टाकण्यात यावी अशी तक्रार आई वसंती सालियन व वडील सतीश सालियन यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे केली आहे. त्यामुळे दिशाच्या मृत्यूबाबत कोणतेही पुरावे नसताना नारायण राणे यांच्याविरुद्ध मृत्यूपश्चात तिचे चारित्र्यहनन करणे, तिची प्रतिष्ठा मलिन करणे, तिची व कुटुंबाची बदनामी करणे त्याचबरोबर दिशाच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय यंत्रणेमार्फत सुरु असल्याची खोटी विधाने करून मुंबई पोलिसांच्या तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर अविश्वास दाखवून दबाव निर्माण करून समाजामध्ये संभ्रम निर्माण करणे या कृत्याबाबत तसेच त्यांनी केलेल्या आरोपांना माध्यमांवरून दुजोरा देणारे नितेश राणे व चंद्रकांत पाटील यांच्यावर तात्काळ फौजदारी कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य महिला आयोगास २४ तासांच्या आत सादर करण्याचे निर्देश वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मालवणी पोलीस स्टेशन यांना दिले आहेत.”

“तसेच दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी समाज माध्यमावर तयार करण्यात आलेले लाखो खोटे अकाउंट्स बंद करून तिच्याबद्दल नमूद असलेली खोटी माहिती तात्काळ काढून टाकण्यात यावी आणि अर्जदार श्रीमती व श्री. सालियन या जेष्ठ नागरिक असलेल्या दाम्पत्याला शांततेने व सुरक्षित जगता यावे याकरिता योग्य ती सुरक्षात्मक उपाययोजना करावी व अर्जदारांच्या मागणीनुसार या प्रकरणी योग्य ती चौकशी करून कारवाई करावी”. अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.


Electricity in Mumbai : मुंबईतील दादर, माहीम, माटुंगा परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत, रेल्वेही रुळावर

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -