घरमहाराष्ट्रतेव्हा उद्धव ठाकरेंनी हप्ता डबल केला, माफिया सेनेचा भ्रष्टाचार बाहेर काढणार, किरीट...

तेव्हा उद्धव ठाकरेंनी हप्ता डबल केला, माफिया सेनेचा भ्रष्टाचार बाहेर काढणार, किरीट सोमय्या कडाडले

Subscribe

कलेक्टर कोण, मेन कॉन्ट्रॅक्टरशी डील करणारा कोण? फिक्सर कोण विमल अग्रवाल. ज्याच्याकडेही धाडी सुरू आहे, त्याला 2018-19 मध्ये अटक झाली होती. ज्याने कसाब घटनेनंतर मुंबई पोलिसांचे बुलेट जॅकेटचं जे रॅकेट बाहेर आलं, ते बोगस जॅकेट पुरवण्याचं काम विमल अग्रवाल याने केलं होतं, त्याला मातोश्रीमध्ये यशवंत जाधवांच्या माध्यमातून फ्री प्रवेश मिळत होता. म्हणून मी सांगतोय ही माफिया सेना आहे. या माफिया सेनेचा व्यवस्थित हिशेब आता बाहेर येणार आहे, असं म्हणत किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केलाय.

मुंबईः यशवंत जाधवनं कशा पद्धतीनं पैसे घेतले, मुख्यमंत्र्यांच्या हातात तो अहवाल आहे. कॅश कुठून कुठे गेलीय, सौदीमध्ये पैसे कसे पोहोचले हे मुख्यमंत्र्यांना माहीत आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यशवंत जाधवांकडून येणारा हप्ता दुप्पट केलाय. या सगळ्या माफियांची चौकशी व्हायलाच हवी, असंही भाजप नेते किरीट सोमय्या म्हणालेत. किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत. त्याचबरोबर मुंबई पालिका आयुक्तांचीही चौकशी व्हावी. ते तिथे राहिल्यानंतर चौकशी होणार कशी, सहा कॉन्ट्रॅक्टरवर तीन दिवस धाडी सुरू आहेत. त्या मुंबई महापालिका आयुक्तांना पहिलं बाजूला करा. मग मुंबई महापालिका माफिया कॉन्ट्रॅक्टरमुक्त होणार आहे, असंही किरीट सोमय्या म्हणालेत.

भाजप नेते किरीट सोमय्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते. शिवसेनेचे महापालिकेचे फंड कलेक्टर म्हणजे शिवसेनेचे यशवंत जाधव यांच्यासंदर्भातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मी गेले चार ते सहा महिने फॉलोअप करतोय. ज्या गेल्या तीन दिवस इन्कम टॅक्सच्या 33 ठिकाणी धाडी चालू आहेत. त्यात उद्धव ठाकरेंच्या महापालिकेचे सहा माफिया कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना लाज वाटली पाहिजे. कलेक्टर कोण, मेन कॉन्ट्रॅक्टरशी डील करणारा कोण? फिक्सर कोण विमल अग्रवाल. ज्याच्याकडेही धाडी सुरू आहे, त्याला 2018-19 मध्ये अटक झाली होती. ज्याने कसाब घटनेनंतर मुंबई पोलिसांचे बुलेट जॅकेटचं जे रॅकेट बाहेर आलं, ते बोगस जॅकेट पुरवण्याचं काम विमल अग्रवाल याने केलं होतं, त्याला मातोश्रीमध्ये यशवंत जाधवांच्या माध्यमातून फ्री प्रवेश मिळत होता. म्हणून मी सांगतोय ही माफिया सेना आहे. या माफिया सेनेचा व्यवस्थित हिशेब आता बाहेर येणार आहे, असं म्हणत किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केलाय.

- Advertisement -

गेल्या दोन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू होता, दोन दिवसांनी पुन्हा कंपनी मंत्रालय, ईडी, इन्कम टॅक्स हा जो तपास आहे, यशवंत जाधवपासून सुरू झालेला तो तपास आतंकवाद्यांशी सामना करण्याच्या रॅकेटपर्यंत जाऊन पोहोचलाय, त्यात हा माणूसही इन्व्हॉल आहे. क्रिप्टोकरन्सी आणि बिटकॉइनचाही यात हात आहे. बोगस कंपन्यांच्या माध्यमातून पैशांची हेराफेरी सुरू आहे. खंडणीतही विमल अग्रवाल इन्व्हॉल आहे. बेटिंगमध्येही विमल अग्रवाल इन्व्हॉल आहे. ब्लॅक लिस्टेड कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्यातही विमल अग्रवालचा हात आहे. म्हणून या तपासात पुढे ईडी आणि कंपनी मंत्रालयानं जॉइंट व्हायला हवं, असा माझा आग्रह आहे, असंही किरीट सोमय्या म्हणालेत.

एका आठवड्यापूर्वी रिपोर्ट आला होता, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी स्थायी समिती अध्यक्षांची हकालपट्टी करायला हवी होती. त्याच्याऐवजी यशवंत जाधवकडून येणारा हप्ता वाढवून घेतला, याला माफिया सेना म्हणतात. यशवंत जाधवनं कशा पद्धतीनं पैसे घेतले, मुख्यमंत्र्यांच्या हातात तो अहवाल आहे. कॅश कुठून कुठे गेलीय, सौदीमध्ये पैसे कसे पोहोचले हे मुख्यमंत्र्यांना माहीत आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यशवंत जाधवांकडून येणारा हप्ता दुप्पट केलाय. या सगळ्या माफियांची चौकशी व्हायलाच हवी. त्याच बरोबर मुंबई पालिका आयुक्तांचीही चौकशी व्हावी. ते तिथे राहिल्यानंतर चौकशी होणार कशी, सहा कॉन्ट्रॅक्टरवर तीन दिवस धाडी सुरू आहेत. त्या मुंबई महापालिका आयुक्तांना पहिलं बाजूला करा. मग मुंबई महापालिका माफिया कॉन्ट्रॅक्टरमुक्त होणार आहे, असंही त्यांनी सांगितलंय.

- Advertisement -

माझ्या घरात माझी बायको आणि सून मराठी

माझी पत्नी प्राध्यापिका आहे. मेधा सोमय्या ओक या मराठी आहेत. माझी सुनबाई मराठी आहे. त्यामुळे माझं मराठीचं ज्ञान जास्त असेल. मराठी भाषेत समृद्धी आहे. माझ्या घरात माझी बायको आणि सून मराठी आहेत. त्यामुळे मराठी माणसंही समृद्ध असतात. माझा जन्मही इथेच झालाय, त्यामुळे महाराष्ट्र आणि राष्ट्र याबद्दल आम्हाला अभिमान आहे, असं म्हणत त्यांनी मराठी भाषा दिनावर प्रतिक्रिया दिलीय.


हेही वाचाः नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल: दिशा सालियानबाबतचे ‘ते’ वादग्रस्त वक्तव्य भोवले

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -