घरदेश-विदेशशिवसेनेला पुन्हा वाटाण्याच्या अक्षता; लोकसभेचे उपाध्यक्षपद YSR पक्षाला?

शिवसेनेला पुन्हा वाटाण्याच्या अक्षता; लोकसभेचे उपाध्यक्षपद YSR पक्षाला?

Subscribe

लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर शिवसेनेचा नैसर्गिक हक्क असल्याचे वक्तव्य काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांनी केले होते. मात्र भाजपने हे पद आता वायएसआर काँग्रेसला देण्याची ऑफर दिली असल्याची चर्चा होत आहे. वायएसआर काँग्रेसला उपाध्यक्षपदाची ऑफर दिल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिवसेना हा एनडीएतील सर्वात जुना मित्र पक्ष आहे. सतराव्या लोकसभेत १८ खासदार निवडून आले असूनही शिवसेनेच्या वाट्याला पुन्हा अवजड उद्योगच आल्याने आधीच नाराज असलेल्या सेनेला उपाध्यक्षपदावरून पुन्हा एकदा वाटाण्याच्या अक्षता दिल्याचा हा प्रकार आहे का? अशी देखील शंका व्यक्त केली जात आहे.

आंध्र प्रदेशमधील २५ पैकी २२ जागा जिंकून वायएसआर काँग्रेस हा लोकसभेतील चौथा मोठा पक्ष ठरला आहे. साधारणः लोकसभेतील तिसऱ्या मोठ्या पक्षाला या पदाचा बहुमान दिला जातो. (दुसरा मोठा पक्ष अर्थातच विरोधी पक्षनेतेपदी असतो) सध्या तिसरा मोठा पक्ष हा डीएमके आहे. मात्र डीएमकेने चार पक्षांना एकत्र करून निवडणूक लढवली होती, त्यामुळे त्यांना या पदाची ऑफर दिलेली नाही. आज (मंगळवारी) भाजपचे खासदर आणि प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्ह राव यांनी वायएसआरचे प्रमुख आणि आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची भेट घेतल्यानंतर उपाध्यक्षपदाच्या चर्चेला उधाण आले.

- Advertisement -

जगनमोहन रेड्डी आणि नरसिम्हा राव यांच्यामध्ये बंद दाराआड सुमारे अर्धा तास ही बैठक झाली, अशी माहीती टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तसंकेतस्थळाने दिली आहे. नरसिम्हा राव यांनी ही औपचारीक भेट असल्याचे सांगत उपाध्यक्ष पदाच्या चर्चेचे दावे फेटाळून लावले आहेत.

वायएसआर पक्षाकडून जगनमोहन यांनी या पदासाठी कोण उमेदवार असू शकेल याची देखील चाचपणी सुरु केली आहे. या पदावर वायएसआरकडून महिला खासदार दिली जाऊ शकते. अराकूच्या खासदार गोड्डेटी माधवी आणि अमलापूरमच्या खासदार चिंता अनुराधा या दोन महिला खासदारांची या पदासाठी चर्चा होत आहे. दरम्यान, भाजपने सहा वेळा खासदार म्हणून निवडून आलेले मध्य प्रदेशचे खासदार विरेंद्र कुमार यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड केलेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -