Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Video : भाजप आमदाराची महिला नगरसेविकेला धक्काबुक्की, व्हिडिओ व्हायरल!

Video : भाजप आमदाराची महिला नगरसेविकेला धक्काबुक्की, व्हिडिओ व्हायरल!

Related Story

- Advertisement -

निवडणुकांचं राजकारण कोणत्याही थराला जाऊ शकतं, हे आपण अनेकदा ऐकतो किंवा पाहातो. आता असाच एक प्रकार समोर आला असून यामध्ये भाजपच्या एका आमदारानं भाजपच्याच एका महिला नगरसेविकेला धक्काबुक्की केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्यानंतर हा प्रकार उघड झाला. हा प्रकार कर्नाटकमधल्या बागलकोट जिल्ह्यामध्ये घडला आहे. महालिंगपुरम नगर पालिकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान हा प्रकार घडला असून नगरसेविकेने संबंधित भाजप आमदाराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून तारडेल मतदारसंघाचे भाजप आमदार सिद्दू सेवडी आणि त्यांचे कार्यकर्ते नगरसेविका चांदनी नाईक यांना धक्काबुक्की करताना दिसत आहेत. निवडणुकीत चांदनी नाईक आणि इतर दोन नगरसेविकांना निवडणुकीत उभं राहायचं होतं. मात्र, सिद्दू सेवडी यांनी त्यांना तिकीट नाकारलं. त्यामुळे संतप्त झालेल्या चांदनी नाईक यांनी आपण काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करणार असल्याचं जाहीर केलं. त्यांच्यासोबत त्यांच्या दोन महिला नगरसेविकांनी देखील काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय घेतला. यासाठी चांदनी नाईक मतदानासाठी नगरपालिकेच्या सभागृहात जात असताना वरील प्रकार घडला.

- Advertisement -

चांदनी नाईक सभागृहात जात असताना सेवडी यांनी त्यांना जाण्यापासून रोखलं. त्यांच्या कार्यकर्त्यांनी चांदनी यांना धक्काबुक्की करायला सुरुवात केली. प्रकरण इतकं विकोपाला गेलं की चांदनी यांना जमिनीवर पाडून त्यांच्या केसांना धरून ओढण्यात आल्याचा देखील दावा करण्यात आला. व्हिडिओमध्ये त्यांना खाली पाडल्याचं स्पष्ट दिसत आहे. या धक्काबुक्कीत खुद्द आमदार सेवडी देखील सहभागी असल्याचं देखील व्हिडिओमध्ये दिसत आहे.

- Advertisement -

दरम्यान, चांदनी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असली, तरी अद्याप या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. महालिंगपुरम नगरपालिकेमध्ये भाजपचे १३ नगरसेवक असून काँग्रेसचे ११ नगरसेवक आहेत. भाजपच्या तीन नगरसेविकांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मत दिल्यास भाजपला पराभवाचा सामना करावा लागला असता.

- Advertisement -