घरदेश-विदेशVIDEO : राज्यमंत्री जाकिर हुसेन यांच्यावर देशी बॉम्ब हल्ला, प्रकृती गंभीर

VIDEO : राज्यमंत्री जाकिर हुसेन यांच्यावर देशी बॉम्ब हल्ला, प्रकृती गंभीर

Subscribe

रेल्वे स्थानकात ट्रेन पकडण्याआधी बॉम्ब स्फोट

पश्चिम बंगालचे राज्यमंत्री जाकिर हुसेन यांच्यावर देशी बॉम्बनं हल्ला करण्यात आला. पश्चिम बंगालमध्ये आगामी निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये वादावादी सुरु आहे. त्यातच आता पश्चिम बंगालचे राज्यमंत्री जाकिर हुसेन यांच्यावर बॉम्ब हल्ला केला. या बॉम्ब हल्ल्यात राज्यमंत्री जाकिर हुसेन आणि त्यांचे समर्थक गंभीर जखमी झाले आहेत. पश्चिम बंगालचे मंत्री जाकिर हुसेन आणि त्यांचे काही समर्थक बुधवारी (१७ फेब्रुवारी) रात्री मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाकडे जात होते. यावेळी काही अज्ञात हल्लेखोरांनी क्रूड बॉम्ब हल्ला केला. राज्यमंत्री जाकिर हुसेन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असुन प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालचे राज्यमंत्री जाकिर हुसेन यांच्यावर रात्री ९.४५ च्या सुमारास घडली. कामगार राज्यमंत्री हुसेन हे कोलकाताला जाण्यासाठी ट्रेन पकडण्या करत जात होते. परंतु रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर पोहोचले असता त्यांच्यावर बॉम्ब हल्ला करण्यात आला. या बॉम्ब हल्ल्यात हुसेन यांच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच इतर जखमींनाही मेडिकल कॉलेज व रुग्णालयात नेण्यात आले आहे. राज्यमंत्री जाकिर हुसेन यांच्यावर कोणी हल्ला केला हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

- Advertisement -

जिल्ह्यातील गायींच्या तस्करी आणि भ्रष्टाचाराला विरोध केल्यामुळे मंत्र्यावर हल्ला झाला. या कामांमध्ये सामील झालेल्या लोकांना त्यांनी विरोध केला होता. त्यांना आज लक्ष्य केले जाण्याचे हेच कारण असू शकते. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती राज्यात सर्वकाळच्या नीचांकावर गेली आहे. असे प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष व बेरहमपूर लोकसभा खासदार अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले. तर ही घटना राज्यात कायदा व सुव्यवस्था नसल्याचा पुरावा आहे. मंत्रीही येथे सुरक्षित नाहीत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष म्हणाले.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -