घरदेश-विदेशब्रिटनमध्ये लव्ह जिहादची ग्रुमिंग गॅंग, सर्वाधिक पाकिस्तानी; सुनक नेमणार टास्क फोर्स

ब्रिटनमध्ये लव्ह जिहादची ग्रुमिंग गॅंग, सर्वाधिक पाकिस्तानी; सुनक नेमणार टास्क फोर्स

Subscribe

 

नवी दिल्लीः ब्रिटनमध्ये ग्रुमिंग गॅंग नावाने एक टोळी सक्रीय आहे. ही टोळी मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवते. त्यांचे शारीरीक आणि मानसिक शोषण करते. या टोळीला रोखण्यासाठी पंतप्रधान ऋषी सुनक हे टास्क फोर्सची स्थापना करणार आहेत. ग्रुमिंग गॅंग हा लव्ह जिहादचाच प्रकार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही हा मुद्दा पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

ब्रिटनेचे पंतप्रधान सुनक यांनी सांगितले की, ग्रुमिंग गॅंगला रोखण्यासाठी टास्क फोर्स तयार केले जाणार आहे. यामध्ये एक विशेष अधिकारी असेल. हा अधिकारी मुलींचे शोषण कशा प्रकारे आणि का केले जात आहे याचा अभ्यास करेल. ग्रुमिंग गॅंगमध्ये नेमक्या कोणत्या जातीचे आहेत, याची माहिती गोळा केली जाईल. त्यांना कठोर शिक्षा दिली जाईल, असेही पंतप्रधान सुनक यांनी स्पष्ट केले.

ग्रुमिंग गॅंगमध्ये सर्वाधिक पाकिस्तानी आहेत. हे सर्व पुरुष आहेत, असे ब्रिटनच्या गृह सचिव सुएला ब्रेवरमैन यांनी सांगितले आहे. त्यावर पाकिस्तानने नाराजी व्यक्त केली आहे. कोणा एका व्यक्तिच्या गुन्ह्यासाठी आमच्या देशाला बदनाम करणे योग्य नाही, अशी व्यथा पाकिस्तानने मांडली आहे.

- Advertisement -

ब्रिटनमधील एका सामाजिक संस्थेने याचा एक अहवाल तयार केला आहे. १६ ते १७ वयोगटातील सुमारे ५० हजार मुली ग्रुमिंग गॅंगला बळी पडल्या आहेत. त्यांचे मानसिक आणि शारीरीक शोषण झाले आहे. त्यातील केवळ पाच हजार मुलींनी पोलीसांत तक्रार दाखल केली आहे.

याआधी ब्रिटनमधील थिंक टॅंक क्विलियम संस्थेने २०१७ मध्ये एक अहवाल दिला होता. ग्रुमिंग गॅंगमधील ८४ टक्के आरोपी आशिया खंडातील आहेत. त्यात सर्वाधिक पाकिस्तानी नागरिक आहेत. या टोळीतील तरुण लहान मुलींना टार्गेट करतात. त्यांना भेट वस्तू देतात. त्यांच खूप प्रेम आहे, असा विश्वास देतात. मुली त्यांच्या साधेपणाला भूलून वाहत जातात. मग त्यांचे शोषण सुरु होते. नंतर ते मुलींना पार्टीत घेऊन जातात. त्यांना तेथे ड्रग्ज देतात. एक किंवा अधिकजणांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी मुलींवर दबाव टाकला जातो. यामुळे काही मुली गरोदर राहिल्या. त्यातील काहींनी गर्भपात केला. काहींनी बाळाला जन्म दिला. त्या बाळाचे वडिल कोण आहे हे त्या मुलींना सांगता आले नाही. ब्रिटनमधील रोशडेल, रॉदरहैम व टेलफॉर्ड येथील मुलींचे सर्वाधिक शोषण झाले आहे, अशी धक्कादायक माहिती अहवालातून समोर आली होती.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -