Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश 'पंतप्रधान नाही तर हिंदू म्हणून आलोय'; ऋषी सुनक पोहोचले मोरारी बापूंच्या रामकथेला

‘पंतप्रधान नाही तर हिंदू म्हणून आलोय’; ऋषी सुनक पोहोचले मोरारी बापूंच्या रामकथेला

Subscribe

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मंगळवारी (१५ ऑगस्ट) केंब्रिज विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये प्रख्यात अध्यात्मिक मोरारी बापूंच्या रामकथेला भेट दिली. यावेळी त्यांनी मोरारी बापूंना पुष्प भेट देत जय सियारामचा नारा दिला.

Rishi Sunak Visits Ram katha of Morari Bapu: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मंगळवारी (१५ ऑगस्ट) केंब्रिज विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये प्रख्यात अध्यात्मिक मोरारी बापूंच्या रामकथेला भेट दिली. यावेळी त्यांनी मोरारी बापूंना पुष्प भेट देत जय सियारामचा नारा दिला. ( Britain PM Rishi Sunak Visits Ram katha of Morari Bapu England Indian Independence Day 15th August )

 ऋषी सुनक  म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्यदिनी केंब्रिज विद्यापीठात मोरारी बापूंच्या रामकथेला उपस्थित राहणे हा सन्मान आणि आनंद आहे. मी आज येथे पंतप्रधान म्हणून नाही, तर हिंदू म्हणून आलो आहे.

- Advertisement -

ब्रिटनचे पंतप्रधान म्हणाले, श्रद्धा माझ्यासाठी अतिशय वैयक्तिक आहे. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूत माझी श्रद्धा मला मार्गदर्शन करते. पंतप्रधान होणे हा एक मोठा सन्मान आहे, पण ते सोपे काम नाही. आपल्याला कठोर निर्णय घ्यावे लागतील, कठीण निवडींना सामोरे जावे लागेल आणि यामुळे मला माझ्या देशासाठी जे सर्वोत्तम आहे ते करण्याचे धैर्य, सामर्थ्य आणि लवचिकता मिळते.

गणेशाची मूर्ती असणे ही अभिमानाची बाब

आज मी इथे पंतप्रधान म्हणून नाही तर हिंदू म्हणून आलो आहे, असं ऋषी सुनक आपल्या भाषणात म्हणाले. यावेळी त्यांनी दिवाळीत लावलेल्या पणत्यांविषयी आपली आठवण सांगितली. तसंच, आपल्या डेस्कवर गणपतीची मुर्ती ठेवणं ही किती अभिमानाची गोष्ट आहे, किती गर्व वाटतो त्याचा याबाबतही त्यांनी सांगितलं.

मोरारी बापूंनी फडकवला तिरंगा

- Advertisement -

कथेपूर्वी, मोरारी बापूंनी सकाळी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून केंब्रिज विद्यापीठात भारतीय स्वातंत्र्याच्या 76 वर्षांचे प्रतीक असलेला भारतीय तिरंगा फडकावला. मोरारी बापू म्हणाले की,  हा एक महत्त्वाचा क्षण आहे कारण मोरारी बापूंनी केंब्रिज विद्यापीठाच्या मैदानात ‘मानस विद्यापीठ’ नावाचा त्यांचा 921 वा धडा आयोजित केला होता, जो ब्रिटीश विद्यापीठात आयोजित हिंदू कार्यक्रमाचे एक प्रमुख उदाहरण आहे.

( हेही वाचा: न्यायालयात महिलांसाठी ‘हे’ शब्द आता वापरले जाणार नाहीत; सर्वोच्च न्यायालयाने हँडबुक केलं जारी )

- Advertisment -