धक्कादायक! ‘BSF’च्या २१ जवानांना कोरोनाची लागण

मागील २४ तासांत बॉर्डर ऑफ सिक्युरिटी फोर्सचे (BSF)चे आणखी २१ जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

corona

कोरोना विषाणूने संपूर्ण जगात अक्षरश: थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधिताच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या कोरोनाला आळा घालण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा, पोलीस प्रशासन, सीमेवर लढणारे जवान अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र, आता हे जवान देखील कोरोनाच्या विळख्यात सापडल्याचे दिसत आहे. मागील २४ तासांत बॉर्डर ऑफ सिक्युरिटी फोर्सचे (BSF)चे आणखी २१ जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, अशी माहिती बॉर्डर ऑफ सिक्युरिटी फोर्सच्यावतीने देण्यात आली आहे.

१२० जवान कोरोनाबाधित

सध्या एकूण १२० जवान कोरोनाबाधित असून आतापर्यंत २८६ जवान कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

२४ तासांत ६,६५४ नव्या रुग्णांची नोंद

भारतात गेल्या २४ तासांत ६ हजार ६५४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर १३७ लोकांचा मृत्यू झाला आहे. आता देशात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या १ लाख २५ हजार १०१ वर पोहोचली आहे. यापैकी ६९ हजार ५९७ सक्रिय प्रकरणे आहेत. त्याचवेळी, कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३ हजार ७२० झाली आहे. तथापि, ही दिलासादायक बाब आहे की उपचारानंतर ५१ हजार ७८४ रुग्ण बरे झाले आहेत.


हेही वाचा – धक्कादायक! सलग दोन दिवस विहिरीत आढळले मृतदेह