घरट्रेंडिंगबुराडी आत्महत्या प्रकरणाला नवा ट्विस्ट

बुराडी आत्महत्या प्रकरणाला नवा ट्विस्ट

Subscribe

बुराडी आत्महत्या प्रकरणानंतर मृतांच्या नातेवाईकांकडून अधिक तपास करण्यात आला. तेव्हा ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे कुटुंबियांनी सांगितले होते. त्या नुसार पोलिसांनी तपास केला होता. डॉक्टरांनी दिलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये ही आत्महत्या झाल्याचे स्पष्ट झाले होते. पण आता या प्रकरणाला एक नवं वळण मिळालं आहे.

दिल्लीतील बुराडी परीसरात एकाच कुटुंबातील ११ जणांनी आत्महत्या केली होती. १ जुलै रोजी हे प्रकरण समोर आले होते. भाटिया कुटुंबाच्या सामूहिक आत्महत्येमुळे देश हादरुन गेला होता. पोस्टमार्टम रिपोर्टनंतर या कुटुंबाने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले होते. पण आता एक या प्रकरणाला २ महिन्यांनतर एक वेगळाच ट्विस्ट आला आहे. आता आलेल्या मनोवैज्ञानिक तपास अहवालानुसार बुराडी कुटुंबातील कोणालाच आत्महत्या करायची नव्हती असा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.

काय होतं बुराडी आत्महत्या प्रकरण- मोक्ष मिळवण्यासाठी आत्महत्या?

- Advertisement -

काय आहे तपास अहवालात?

भाटिया कुटुंबातील ललित भाटिया या आत्महत्येमागे असल्याचे अहवालातून समोर आहे आहे. भाटिया यांच्या घरात मिळालेल्या रजिस्टरनुसार ललित मोक्ष प्राप्तीसाठी बद्दल लिहून ठेवत होता. गेल्या कित्येक वर्षांपासून ललित नोंदी करत होता. ३० जूनच्या रात्री त्याने घरातील प्रत्येकाला फासावर लटकण्यासाठी तयार केले. यात तुमचा मृत्यू होणार नाही असे सांगितले. पण प्रत्यक्षात फासावर चढल्यानंतर काही मिनिटातच त्यांचे प्राण गेले. घटनेच्या तपासानंतर दिल्ली पोलिसांनी सीबीआईला मनोवैज्ञानिक तपास करण्याची मागणी केली होती. त्यानंतर झालेल्या तपासात हे धक्कादायक सत्य समोर आले आहे.

अधिक माहिती साठी वाचा- आत्महत्येचे प्लॅनिंग आधीपासूनच?

शेजाऱ्यांकडूनही घेतली मदत

बुराडी आत्महत्या प्रकरणानंतर मृतांच्या नातेवाईकांकडून अधिक तपास करण्यात आला. तेव्हा ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे कुटुंबियांनी सांगितले होते. त्या नुसार पोलिसांनी तपास केला होता. डॉक्टरांनी दिलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये ही आत्महत्या झाल्याचे स्पष्ट झाले होते. दिल्ली पोलिसांच्या मागणीनंतर केलेल्या मानसशास्त्रीय दृष्टया तपास करण्यात आला. यावेळी घरातील बारीक बारीक वस्तूचा तपास केला गेला. शिवाय त्यांच्या वागणुकीची अधिक विचारपूस शेजाऱ्यांकडे करण्यात आली. त्यानुसार ललितचे ऐकूनच त्यांनी हा सगळा प्रकार केल्याचे समोर आले आहे.

वाचा- बुराडी आत्महत्या प्रकरण : नारायणी देवींच्या मृत्यूचे गूढ उलगडले
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -