घरदेश-विदेशहिमाचल प्रदेशात बस दरीत कोसळून १२ जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशात बस दरीत कोसळून १२ जणांचा मृत्यू

Subscribe

डीएसपी डलहौजी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची एक टीम या घटनेचा तपास करत आहे.

शनिवारी हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील बनिखेत जवळील पंचपुला येथे एक बस खोल दरीत कोसळली. या घडलेल्या अपघातात मृत पावलेल्यांची संख्या ८ वरून १२ झाली आहे. यामध्ये अनेक जण लोक जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना उपचाराकरिता जवळील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा अपघात हिमाचल प्रदेशमधील पठाणकोट-डलहौजी मार्गावर झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचेले. या अपघात दुर्घटनेत मृत झालेल्यांना शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

- Advertisement -

तात्काळ बचावकार्य सुरू

या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. डीएसपी डलहौजी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची एक टीम या घटनेचा तपास करत आहे. तर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी जिल्हा प्रशासनाला तात्काळ बचावकार्य सुरू करून पीडितांना कोणत्याही प्रकारची मदत करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, जखमींना तात्काळ रुग्णालयात भरती करून त्यांच्यावर योग्य उचपार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -