घरदेश-विदेशतरुणाने केलेल्या 'या' युक्तीने मिळवल्या शेकडो जॉब ऑफर्स

तरुणाने केलेल्या ‘या’ युक्तीने मिळवल्या शेकडो जॉब ऑफर्स

Subscribe

हल्ली जॉब मार्केट प्रगती करत असून नोकरी मिळवण्यासाठी प्रंचड स्पर्धा आहे. एकाच पदासाठी शेकडो उमेदवारांमध्ये शर्यत लागते मात्र सगळीकडे एकसारखी स्थिती नसते. आपल्या आवडीची नोकरी मिळवण्यास अनेकांना यश मिळत नाही तर इतरांना कोणतीही नोकरी चालते. मात्र कॅलिफोर्नियाच्या एका तरुणाने नोकरी मिळवण्यासाठी लावलेल्या शक्कलमुळे त्याला तब्बल २०० ठिकाणांहून नोकरीच्या ऑफर मिळाल्या. या तरुणाचे नाव डेव्हिड कॉसरेझ आहे. हा तरुण एक वेब डेव्हलपर असून तो याच विभागात राहतो. परिसरातील एका सिग्नलवर उभ राहून त्याने आपले सीव्ही वाटले. तेव्हाच तेथे आलेल्या एका महिलेनी त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकला. त्यामुळे बेघर तरुणाला अनेक मदतीचे हाथ मिळाले.

कशी आली युक्ती?

मागील काही दिवसांपासू डेव्हिडला नोकरी नव्हती. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने नोकरीचा शोध घेतला मात्र त्याला नोकरी मिळाली नाही. घरचे भाडे भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे अखेर त्याला घरातूनही काढण्यात आले. जूलै २७ रोजी सकाळी तयार होऊन त्याने हायवेचा सिग्नल गाठला. हाताथ एक बोर्डवर “होमलेस, यशासाठी भुकेलेला,सिव्ही घ्या” असा मजकूर लिहून तो सिग्नलवर उभा राहिला. याच ठिकाणावरुन जात असलेल्या जास्मिनने याचा आणि त्याच्या सीव्हीचा फोटो काढला. हा फोटो ट्विटरवर टाकून तिने ऑनलाईन मदत करण्याचे आवाहन केले.

- Advertisement -


त्याच्या सिव्हीवरील माहितीनुसार २०१४ मध्ये युनिव्हर्सिटीमधून मॅनेजमेंट मधून पदवी मिळवली. जास्मिन आपल्या ट्विटरवर लिहीले, “हा तरुण सिलिकॉन व्हॅलीमध्ये आयटीमध्ये काम करयची स्वप्न बाळगून आला आहे. घर नसल्याने हा तरुण उद्यानामध्ये झोपतो.” पुढच्या दिवशी या ट्विटला ५० हजार जणांनी रिट्विट केलं. त्यामुळे या तरुणाला बरेच फोन आले. आयटीतील दिग्गज आणि स्टार्टअप कंपन्यांव्दारेही त्याला जॉब ऑफर मिळाली. ऑफर मिळवणाऱ्या कंपन्यांमध्ये बिटकॉईन्स कंपनी देखील सामिल होती. बिटकॉईन्सच्या मॅनेजरने या तरुणाला टोकिओ येथे जॉब ऑफर केली. अचानक मिळालेल्या यशामुळे तरुणांना नक्कीच एक चांगली नोकरी मिळाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -