घरदेश-विदेशतिरुपती देवस्थानची माघार, शिवाजी महाराजांच्या मूर्तींसह गाड्यांना मिळणार प्रवेश

तिरुपती देवस्थानची माघार, शिवाजी महाराजांच्या मूर्तींसह गाड्यांना मिळणार प्रवेश

Subscribe

आध्रप्रदेशमधील प्रसिद्ध तिरूपती बालाजी मंदिरात प्रवेश करताना यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घेऊन जाण्यास कोणतीही अडचण येणार नाही, अशी माहिती परभणीचे शिवसेना खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी दिली. खासदार संजय जाधव सध्या बालाजी मंदिरात दर्शनासीठी गेले आहेत. त्यांनी तिथल्या प्रशासनाशी चर्चा केली आणि या वादावर तोडगा काढला आहे. याबाबत मंदिर प्रशासनासोबत पत्रकार परिषद घेवून त्यांनी माहिती दिली.

काही दिवसांपासून आंध्र प्रदेशातील तिरूपती बालाजी देवस्थान चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील एक व्यक्ती तिथे गेला असता, त्याच्या गाडीमधील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, स्टिकर काढायला लावली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रातील लोकांकडून तिरुपती देवस्थानाबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आता या प्रकरणात तिरुपती बालाजी देवस्थानाने माघार घेतली असून, यापुढे शिवरायांची मूर्ती घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.

- Advertisement -

खासदार बंडू जाधव काय म्हणाले –

- Advertisement -

मीडियाशी संवाद साधताना खासदार जाधव म्हणाले, मी 3 दिवसांपासून तिरुमला तिरुपती मंदिरात आहे. व्यास महाराजांचे कथा/किर्तन ऐकण्यासाठी आलो होतो. यावेळी  मंदिराचे मुख्य विश्वस्त ए.व्ही.धर्मा रेड्डी हेदेखील उपस्थित होते. दरम्यान चार दिवसांपूर्वी मी एक फेसबूक पोस्ट बघितली होती. त्याबाबत मी रेड्डी यांच्याशी चर्चा केली. यावर अशी कोणतीही अडवणुकीची कृती मंदिर प्रशासनाकडून झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इथल्या नियमानुसार मंदिराच्या आवारत कोणत्याही राजकीय, सामाजिक पक्षाचा झेंडा, निशाणी, चिन्ह यावर बंदी आहे. मात्र, भाविकांकडून गाड्यांत लावण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची, गणपती, हनुमान यांच्या छोट्या मुर्त्यांवर बंदी नाही. त्यामुळे या छोट्या मुर्त्यां गाडीत असल्यास यापुढे देखील मंदिर प्रशासनाकडून कोणतीही अडवणूक होणार नाही, असे खासदार जाधव यांनी स्पष्ट केले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -