घरदेश-विदेशछोट्याशा व्यापाऱ्याने केली १० हजार कोटींची फसवणूक

छोट्याशा व्यापाऱ्याने केली १० हजार कोटींची फसवणूक

Subscribe

दिल्लीतील करोलबाग परिसरातील एका छोट्या व्यापाऱ्याने दहा हजार कोटींचा घोटाळा केला आहे. या प्रकरणी सीबीआयने या कंपनीवर छापे मारले आहे. दोषींना अटक करून पुढील कारवाई सुरु केली.

फसवणूकीच्या घटना नेहेमीच उघडकीस येत असतात. आतापर्यंत निरनिराळ्या पद्धतींचा वापर करून फसवणूक केल्या जाते. मात्र दिल्ली येथे सेबीच्या भारतीय प्रतिभूति और विनिमय बोर्ड (सेबी) च्या मार्गदर्शनाचे उल्लंघन करून घोटाळा करण्यात आला आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) ने यावर नुकतीच कारवाई केली आहे. पश्चिम दिल्लीतील करोल बाग भागात एका नोंदणीकृत डॉट कॉमवर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी  तरूण त्रिखा, वरुण त्रिखा, वीणा त्रिखा, सिक्खा त्रिखा, शक्ति शरद, अनुप कुमार आणि कबीता गांगुली यांना ताब्यात घेण्यात आले आहे. लोकांना फसवून तब्बल १० हजार कोटींचा घोटाळा करण्यात आला आहे. या प्रकरणी सीबीआयने फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरु केली आहे.

कंपनी प्रमोटर आणि असोसिएशन विरोधात गुन्हा दाखल

tviexpress.com चे अधिकृत कार्यालय दिल्लीतील करोलबाग परिसरात आहे. लोकांचे पैशाची गुंतवून, शेअर ट्रेडिंग, कमोडिटी ट्रेडिंग, सुट्टी पॅकेज बुकींग आणि एअर तिकिटांचा व्यवसाय ही डॉटकॉम करतात. त्यांना अधिक पैसे देण्याचे आमिष या कपंनीने दाखवले. सुरुवातीला पश्चिम बंगाल येथील मुर्शिदाबाद पोलीस ठाण्यात या बद्दल गुन्हा नोंदवण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -