घरदेश-विदेशमोदींना अडकवण्यासाठी सीबीआयने दबाव आणला होता, अमित शाहांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

मोदींना अडकवण्यासाठी सीबीआयने दबाव आणला होता, अमित शाहांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Subscribe

Amit Shah allegation on Congress | काँग्रेस सरकारच्या काळात नरेंद्र मोदींना अडकवण्यासाठी माझ्यावर सीबीआयने दबाव आणला होता, असा गंभीर आरोप अमित शाहांनी केला आहे.

Amit Shah allegation on Congress | नवी दिल्ली – केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून केंद्र सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप सातत्याने केला जात आहे. परंतु, केंद्रीय गृहमंत्री यांनी केलेल्या एका दाव्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात नरेंद्र मोदींना अडकवण्यासाठी माझ्यावर सीबीआयने दबाव आणला होता, असा गंभीर आरोप अमित शाहांनी केला आहे. नेटवर्क १८ समूहाच्या रायजिंग इंडिया सम्मेलन २०२३ मध्ये ते बोलत होते.

मी केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराचा बळी आहे. काँग्रेसने आमच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला नव्हता का? एका एन्काऊंटर प्रकरणात सीबीआयने मला अटक केली. तेव्हा मी गुजरातचा गृहमंत्री होतो. तत्कालीन काँग्रेस सरकारने ते मिटवले नसेल तर सीबीआयच्या रेकॉर्डवर अजूनही असेल. सीबीआयने मला विचारलेल्या ९० टक्के प्रश्नांमध्ये हेच होतं की “तुम्ही कशाला त्रास घेताय, मोदींचे नाव घ्या, तुम्हाला सोडून देऊ. त्यावेळी आम्ही काळे कपडे घालून आंदोलने केली नाहीत,” असा टोलाही त्यांनी लगावला.

- Advertisement -

हेही वाचा – देशाच्या १३० कोटी लोकसंख्येवर अमित शाहांचं मोठं विधान, म्हणाले;

राज्याचे मुख्यमंत्री असतानाही नरेंद्र मोदींविरोधात काँग्रेसने एसआयटी लावली होती. भ्रष्टाचाराचे प्रकरण नव्हते. दंगलीत भूमिका असल्याचे खोटे प्रकरण रचले गेले, परंतु, सर्वोच्च न्यायालयाने हे आरोप फेटाळून लावले. याप्रकरणी काहीही आदळ-आपट केलेली नाही. आम्ही कधीही काळे कपडे घालून संसद ठप्प केली नाही. मला अटक करण्यात आली. उच्च न्यायालयाने मला ९० दिवसांत जामीन मंजूर केला. त्यावेळी, मला अटक करण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत, असं न्यायालयाने म्हटलं होतं, असंही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं.

- Advertisement -

काँग्रसने गुजरातबाहेर जाऊन मुंबईत माझ्यावर खटला चालवला, असंही अमित शाह म्हणाले. “राजकीय सुडबुद्धी आणि राजकीय इशाऱ्यावर सीबीआयने केस केली होती. त्यामुळे आम्ही अमिथ शाह यांच्यावरील खटला आणि असर्व आरोप फेटाळऊन लावतो, असं कोर्टाने म्हटलं होतं”, हेही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

खोटे खटले दाखल झाल्यानंतरही आम्ही आदळ-आपट केली नव्हती. तेव्हा पी.चिंदबरम, सोनिया गांधी आणि राहुल गांधी हेच लोक होते. पण आम्ही त्यांच्यावर कोणताही खोटा गुन्हा दाखल केलेला नाही, असं अमित शाह म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -