घरमहाराष्ट्रनाशिकभाजप-शिवसेनेची सावरकर गौरव यात्रा

भाजप-शिवसेनेची सावरकर गौरव यात्रा

Subscribe

आ. देवयानी फरांदे : ठाकरेंनी काँग्रेससोबत युती तोडून दाखवण्याचे आव्हान

नाशिक :  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी भाजप व शिवसेनेतर्फे ३० मार्चपासून राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी दिली. ही यात्रा ६ एप्रिलपर्यंत चालणार आहे. राहुल गांधी व काँग्रेसच्या अन्य नेत्यांकडून सावरकरांचा वारंवार अवमान केला जात आहे. सावरकरांचा अपमान करणार्‍या काँग्रेसबरोबरची युती उद्धव ठाकरे यांनी तोडून दाखवावीच, असे आव्हानही आमदार फरांदे यांनी दिले.

यावेळी बोलताना आमदार फरांदे यांनी सांगितले की, राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांतून सावरकर गौरव यात्रा प्रवास करेल. सावरकर गौरव यात्रा यात्रेच्या माध्यमातून नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्यात येणार आहे. ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनी या यात्रेचा समारोप होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे तसेच, भाजप-शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी या यात्रेत सहभागी होणार आहेत.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार होणारा अपमान सत्ता टिकवण्यासाठी निमूटपणे सहन केला. सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा विचार सोडून दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचा अपमान करणार्‍या मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला रस्त्यावर उतरून जोडे मारले होते. तशी हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवायला हवी होती, असेही आमदार देवयानी फरांदे यांनी नमूद केले.

असे आहे नियोजन :

विभागवार प्रमुख

  • मुंबई :आ. अमित साटम
  • ठाणे-कोकण : आ. निरंजन डावखरे, आ. नितेश राणे
  • पश्चिम महाराष्ट्र : प्रदेश महामंत्री मुरलीधर मोहोळ, विक्रम पावसकर
  • उत्तर महाराष्ट्र : आ. जयकुमार रावल, प्रदेश महामंत्री विजय चौधरी
  • मराठवाडा : आ. संभाजी निलंगेकर, प्रदेश महामंत्री संजय केणेकर
  • पूर्व विदर्भ : आ. प्रवीण दटके, आ. विजय रहांगडाले
  • पश्चिम विदर्भ : आ. संजय कुटे, प्रदेश महामंत्री आ. रणधीर सावरकर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -