घरदेश-विदेशCBSE ने बदलले परीक्षेचे नियम, आता अशा होणार परीक्षा, प्रश्नपत्रिकांमध्येही बदल

CBSE ने बदलले परीक्षेचे नियम, आता अशा होणार परीक्षा, प्रश्नपत्रिकांमध्येही बदल

Subscribe

नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत बदललेल्या परीक्षा पद्धतीत दहावीचे ४० टक्के प्रश्न (question) आकलनावर आधारित असतील. त्यामुळे मुलांची रट्टा मारण्याची प्रवृत्ती थांबेल. केस आधारित हे प्रश्न असतील

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई – CBSE) आता पुन्हा आपला जुना पॅटर्न (old patern) अवलंबला आहे. सीबीएसईने दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे नियम बदलले आहेत. या नवीन नियमांनुसार आता पुढील वर्षीपासून सीबीएसई बोर्डाच्या दहावी (10th exam) आणि बारावीच्या परीक्षा (12th exam) एकदाच होणार आहेत. तसेच सीबीएसईने नववी, दहावी आणि अकरावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिकांमध्येही बदल केले आहेत.

नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत बदललेल्या परीक्षा पद्धतीत दहावीचे ४० टक्के प्रश्न (question) आकलनावर आधारित असतील. त्यामुळे मुलांची रट्टा मारण्याची प्रवृत्ती थांबेल. केस आधारित हे प्रश्न असतील. याशिवाय २० टक्के प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतील. तर ४० टक्के प्रश्नांची उत्तरे लहान असतील.

- Advertisement -

समजून घेऊन अभ्यास

याशिवाय बारावीच्या परीक्षेतील प्रश्नांमध्ये करण्यात आलेल्या बदलांमध्ये ५० टक्के प्रश्न लहान व दीर्घ उत्तरे विचारण्यात येणार आहेत. तर 30 टक्के आकलनावर आधारित आणि 20 टक्के वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतील. सीबीएसई शाळांच्या शिक्षकांच्या म्हणण्यानुसार, या पॅटर्नमुळे विद्यार्थ्यांना पाठांतरपेक्षा समजून घेऊन अभ्यास करावा लागेल. तरच ते अशा प्रश्नांची अचूक उत्तरे देऊ शकतील. हायस्कूल आणि इंटरमिजिएटच्या अंतर्गत परीक्षा पद्धतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे सीबीएसईने  (CBSE) आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. पूर्वी ज्या पद्धतीने शाळा अंतर्गत परीक्षा घेत असत, त्याच पद्धतीने यापुढेही घेतील.

- Advertisement -

असे असेल प्रश्नपत्रिकेचे स्वरूप 

९ वी आणि १० वी

एकूण गुण : 100

आकलनावर आधारित प्रश्नः  ४० टक्के

वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्नः २० टक्के

लहान आणि दीर्घ उत्तरे प्रश्न: 40 टक्के

11 वी आणि 12 वी

एकूण गुण: 100

आकलन आधारित: 30 टक्के

वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्नः २० टक्के.

लहान आणि दीर्घ उत्तरे प्रश्न: 50 टक्के

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -