घरताज्या घडामोडीचिंताजनक! ओमिक्रॉनच्या बीए-5 उपप्रकाराचा भारतात आढळला पहिला रुग्ण

चिंताजनक! ओमिक्रॉनच्या बीए-5 उपप्रकाराचा भारतात आढळला पहिला रुग्ण

Subscribe

दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनच्या बीए-4 आणि बीए-5 या उपप्रकारांमुळे कोरोनाची पाचवी लाट आली होती. त्यामुळे या 80 वर्षीय वृद्ध व्यक्तीने आंतरराष्ट्रीय प्रवास केला होता का, याची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी कोणताही आंतरराष्ट्रीय प्रवास न केल्याची माहिती मिळाली.

भारतातील तेलंगणा (Telangana) राज्यात ओमिक्रॉन विषाणूचा (Omicron) उपप्रकार बीए-5 लागण झाल्याचा पहिला रुग्ण आढळला आहे. एका 80 वर्षी वृद्ध व्यक्तीला बीए-5 ची लागण झाली आहे. तसेच, त्यांना सौम्य लक्षणे असल्याची माहिती समोर येत आहे. सध्यस्थितीत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दक्षिण आफ्रिकेत (South Africa) ओमिक्रॉनच्या बीए-4 (Omicron BA-4) आणि बीए-5 (Omicron BA-5) या उपप्रकारांमुळे कोरोनाची पाचवी लाट आली होती. त्यामुळे या 80 वर्षीय वृद्ध व्यक्तीने आंतरराष्ट्रीय प्रवास केला होता का, याची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी कोणताही आंतरराष्ट्रीय प्रवास न केल्याची माहिती मिळाली. तसेच, बीए-5 ची लागण होण्यापूर्वी त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले होते. याबाबत INSACOG या जिनोम सिव्वेंसिंग करणाऱ्या संस्थेने पुष्टी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – China Lockdown: ओमिक्रॉनच्या सब-व्हेरिएंटने वाढवली डोकेदुखी; चीनमध्ये आतापर्यंत सर्वांत मोठा लॉकडाऊन

दक्षिण आफ्रिकेनंतर युनायटेड स्टेट्स (US) तसेच युरोपीय देशांमध्ये ओमिक्रॉनच्या बीए-४ आणि बीए-५ या उपप्रकराचा फैलाव पसरला होता. त्यामुळे ओमिक्रॉनच्या बीए-5 या उपप्रकाराला युरोपीय रोग नियंत्रण आणि प्रतिबंध विभागाने चिंताजनक म्हटलं आहे. शिवाय, जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) या उपप्रकाराला दखलपात्र आणि चिंताजनक असल्याचे सांगत, काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ओमिक्रॉनच्या या उपप्रकारामुळे रुग्णसंख्या वाढत असली, तरी रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण किंवा मृत्यूसंख्या वाढली नसल्याची माहिती मिळते.

- Advertisement -

हेही वाचा – प्रयागराजच्या गंगा नदीकाठी पुन्हा कोरोनासदृश परिस्थिती; वाळूत सर्वत्र मृतदेह पुरल्याचे चित्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात मोठ्याप्रमाणात लसीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे भारतात सध्या मृत्यूसंख्या वाढण्याची शक्यता नसल्याचे मत तज्ज्ञांनी सांगितले. दरम्यान, याआधी ओमिक्रॉन विषाणूच्या बीए-4 या उपप्रकाराची लागण झालेले दोन रुग्ण आढळले आहेत. यामधील एक रुग्ण हा हैदराबाद तर एक तामिळनाडू येथील आहे.

हैदराबाद येथील रुग्ण दक्षिण आफ्रिकेमधून प्रवास करुन आला होता. विमानतळावर आल्यानंतर त्याची चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी त्याला बीए-4 या उपप्रकाराची लागण झाल्याचे समोर आले. तसेच, तामिळनाडू येथील रुग्ण ही 19 वर्षीय महिला आहे.


हेही वाचा – Monkeypox Virus : कोरोनानंतर मंकीपॉक्स व्हायरसची दहशत, केंद्र सरकारकडून राज्यांना अलर्ट

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -