घरट्रेंडिंगCCTV : प्रेमाला नकार देणाऱ्या तरुणीची दिवसा ढवळ्या डोक्यात गोळी घालून हत्या!

CCTV : प्रेमाला नकार देणाऱ्या तरुणीची दिवसा ढवळ्या डोक्यात गोळी घालून हत्या!

Subscribe

प्रेमाला नकार दिल्याच्या रागात एका तरुणाने हरियाणाच्या फरीदाबादमध्ये तरुणीची डोक्यात गोळी घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिवसाढवळ्या हा प्रकार घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलं असून त्यातून हा सगळा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, तरूणीच्या भावाच्या तक्रारीवरून तौफिक नावाच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे. सोमवारी सकाळी याच परिसरात तपासणीसाठी बाईकस्वाराला अटक केल्यामुळे काही अज्ञात लोकांनी होमगार्डवर फायरिंग केल्याची घटना घडली होती. त्यामुळे दिवसभरातली ही दुसरी घटना होती.

नक्की घडलं काय?

फरीदाबादच्या वल्लभनगरमध्ये असलेल्या अगरवाल कॉलेजमध्ये शिकणारी निकिता आज सकाळी कॉलेजमध्ये परीक्षा देण्यासाठी आली होती. संध्याकाळी ४ च्या सुमारास पेपर सुटल्यानंतर ती बाहेर आली. निकिताला घेण्यासाठी तिचा भाऊ नवीन आणि तिची आई आली होती. मात्र, तेवढ्यात गेटच्या बाहेरच एक आय-२० कार येऊन थांबली. त्यातून तौफीक आणि अजून एक व्यक्ती उतरली. त्यातल्या तौफिकने निकिताला गाडीत बसण्याची जबरदस्ती केली. पण निकिताने नकार दिल्यामुळे तौफीकने गावठी कट्टा काढून तिच्यावर गोळी चालवली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

- Advertisement -

दरम्यान, तौफिकने आपला गुन्हा पोलिसांकडे कबूल केला आहे. तौफिकने पोलिसांना सांगितलं की, ‘मी तिला मारून टाकलं कारण ती दुसऱ्या कुणासोबत तरी लग्न करणार होती. २४ आणि २५ ऑक्टोबरच्या रात्री आमच्या दोघांमध्ये बराच वेळ फोनवर बोलणं झालं होतं. जवळपास १ हजार सेकंदांपेक्षा जास्त वेळ हा कॉल सुरू होता.’ तौफिक राजकीय पार्श्वभूमीच्या कुटुंबाचा सदस्य आहे. त्याचे आजोबा कबीर अहमद आमदार होते. त्याचा चुलत भाऊ आफताब अहमद मेवात जिल्ह्यातल्या नूह मतदारसंघातून काँग्रेसचा आमदार आहे. तर आफताब अहमदचे वडील खुर्शीद अहमद हरियाणाचे माजी मंत्री होते. तौफिकचे सख्खे काका जावेद अहमद यावेळी बीएसपीचे आमदारकीसाठी उमेदवार होते.

- Advertisement -

निकिताला रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तौफीक १२वीपर्यंत निकितासोबत शिकत होता. याआधीही एकदा २०१८मध्ये त्याने निकिताचं अपहरण केलं होतं. पण तेव्हा दोन्ही बाजूच्या कुटुंबांनी मध्यस्थी करत प्रकरण मिटवलं होतं. यावेळी मात्र तौफिकने निकितावर थेट गोळीबार केल्यामुळे यामध्ये तिचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -