घरताज्या घडामोडीकेंद्राने ७२ हजार अमेरिकन रायफल्ससह २२९० कोटी रुपयांच्या शस्त्र खरेदीस दिली मान्यता

केंद्राने ७२ हजार अमेरिकन रायफल्ससह २२९० कोटी रुपयांच्या शस्त्र खरेदीस दिली मान्यता

Subscribe

भारत-चीन सीमेवरील तणाव कायम आहे. पूर्व लडाखमध्ये चीनबरोबर सुरू असलेल्या सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर भारत आपली संरक्षण क्षमता बळकट करत आहे. दरम्यान संरक्षण मंत्रालयाने सोमवारी भारतीय लष्कराला उपकरण आणि शस्त्र खरेदीसाठी २ हजार २९० कोटी रुपये निधीच्या प्रस्तावांना मंजूरी दिली आहे. यामध्ये अमेरिकाकडून ७२ हजार असॉल्ट रायफल खरेदीचा समावेश आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण अधिकग्रहण परिषद (डीएसी)ने अमेरिकन कंपनी एसआयजी सौर (SiG Sauer) यांच्याकडून ७८० कोटी रुपयांच्या असॉल्ट रायफल्सच्या खरेदीसाठी देखील मंजूरी देण्यात आली आहे. .

- Advertisement -

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात करण्यात आलेल्या फास्ट ट्रॅक खरेदी अंतर्गत भारतीय लष्कराला यापूर्वी ७२ हजार ४०० एसजी रायफल्स देण्यात आल्या आहेत. 7.62×51 मिमी कॅलिबरच्या या रायफल्समध्ये ५०० मीटरची प्रभावी अग्निशामक शक्ती आहे. यासह संरक्षण अधिग्रहण परिषदेने सोमवारी ९७० कोटी रुपये किमतीचे स्वदेशी स्मार्ट अँटी-एअरफील्ड शस्त्रे आणि ५४० कोटी रुपयांच्या एचएफ ट्रान्ससीव्हर सेट्स खरेदी करण्यास मान्यता दिली.


हेही वाचा – अनिल अंबानी कर्जाच्या ओझ्याखाली; ३ चीनी बँका त्यांच्या परदेशातील संपत्तीवर जप्ती आणणार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -