घरदेश-विदेशLokSabha Election : या दोन राज्यांमधील मतमोजणीच्या तारखेत बदल; नेमकं कारण काय?

LokSabha Election : या दोन राज्यांमधील मतमोजणीच्या तारखेत बदल; नेमकं कारण काय?

Subscribe

नवी दिल्ली :  बहुप्रतीक्षित लोकसभा निवडणुकीच्या तारखांची शनिवारी दुपारी घोषणा झाली. आणि सगळ्या राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली. लोकसभा निवडणुकांसोबतच अरुणाचल प्रदेश, सिक्किम, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. यासोबतच प्रलंबित पोटनिवडणूक देखील होणार आहे. या चारही राज्यांची मतमोजणी लोकसभेच्या मतमोजणीसोबतच 4 जून रोजी करण्याचे जाहीर केले. मात्र आता निवडणूक आयोगाने अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम येथील मतमोजणीच्या तारखेत बदल केला आहे. आता येथे 4 जून ऐवजी 2 जूनला मतमोजणी होणार आहे. असे असले तरी, येथील मतदान ठरलेल्या तारखेलाच होणार आहे.

हेही वाचा – Raj Thackeray : मनसे-भाजपा युतीच्या हालचालींना वेग; राज ठाकरे दिल्लीला रवाना

- Advertisement -

यामागचं कारण काय ?

अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोन्ही राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ 2 जूनला संपणार आहे. यामुळेच मतमोजणी 2 जून पर्यंत पूर्ण होणं गरजेचं आहे. हे लक्षात घेत निवडणूक आयोगाने या दोन्ही राज्यांतील मतमोजणीच्या तारखा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 2 जूनला या राज्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

- Advertisement -

हेही वाचा – Congress : गेल्या 10 वर्षांत काँग्रेसला पडली इतकी खिंडारे, शिवराजसिंह चौहान यांनी दिली यादी

अरुणाचल प्रदेशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला मतदान पार पडणार आहे. यासाठी दोनच दिवसात म्हणजे 20 मार्च रोजी अधिसूचना जारी होईल, त्यानंतर उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरू होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 27 मार्च ही अंतिम तारीख आहे. 28 मार्चला उमेदवारी अर्ज पडताळणी होईल आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 30 मार्च 2024 पर्यंतची मुदत आहे. दरम्यान, या दोन विधानसभांच्या मतदान कार्यक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. येथे आधी जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसारच मतदान होणार आहे.

हेही वाचा – Election Commission : सहा राज्यांच्या गृहसचिवांना निवडणूक आयोगाने हटवले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -