घरताज्या घडामोडी'त्या' नराधमाने चिमुरडीचा चावा घेतला, बलात्कार केला आणि विहीरीत फेकून दिलं!

‘त्या’ नराधमाने चिमुरडीचा चावा घेतला, बलात्कार केला आणि विहीरीत फेकून दिलं!

Subscribe

आपण पकडले जाऊ या भीतीनं त्यानं मुलीच्या भावाला ठार मारलं. त्यानंतर झुडपात त्याचा मृतदेह फेकून दिला.

छत्तीसगढमधील कोरिया जिल्ह्यातील ही भयानक घटना वाचून तुमच्या आगांवर काटा येईल. एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका १७ वर्षीय मुलानं ५ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तीला विहीरीत फेकून दिलं. तिच्या अंगावर अनेक ठिकाणी चावा घेतल्याच्या जखमा होत्या. त्या लहानमुलीच्या भावालाही गळा आवळून ठार मारलं.

१७ वर्षाच्या मुलानं पाच वर्षीय चिमुकलीवर तिच्या सहा वर्षाच्या भावासमोरच बलात्कार केला. तिचा प्रचंड छळ करण्यात आला. तिच्या अंगाला चावा घेतला. आणि तीचा मृतदेह विहरीत फेकून दिला. आपण पकडले जाऊ या भीतीनं त्यानं मुलीच्या भावाला ठार मारलं. त्यानंतर झुडपात त्याचा मृतदेह फेकून दिला.

- Advertisement -

पण सुदैवाने या पाच वर्षाच्या मुलीला पोहता येत होतं. त्यामुळे ती बुडाली नाही. ती बराच वेळ पाण्यात पोहत राहीली आणि तीने मदतीसाठी आरडाओरड केला. त्यामुळे विहीरीच्या बाजूने जाणाऱ्याला आवाज आला. त्याने विहीरीत उडी मारून मुलीला वाचवलं. मुलीला बाहेर काढताच या सगळ्या घटनेचा उलगडा झाला.

काय घडलं नेमकं

५ वर्षांची मुलगी आपल्या चुलत भावासोबत बाजूच्याच शेतात खेळत होती. त्याचवेळी शेजारच्या गावातील एक १७ वर्षीय मुलगा त्यांच्याजवळ गेला. त्याने या दोघांशी ओळख वाढवली. शेतावर गेला आणि दोन्ही मुलांना झाडपाला तोडण्यासाठी जंगलात घेऊन गेला. तेथे नेल्यानंतर त्याने मुलीवर बलात्कार केला. चावा घेतल्याने तिच्या गालावर आणि पोटावर जखमा झाल्या होत्या. बलात्कार केल्यानंतर आरोपीने मुलीला जवळच्याच एका विहिरीत फेकून दिलं. तसंच आपण पकडले जाऊ नये या भीतीनं त्याने तिच्या चुलत भावाची गळा दाबून हत्या केली. त्याचा मृतदेह झुडपात फेकून तो तेथून पसार झाला.

- Advertisement -

पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीनं मुलाचा शोध घेतला. त्याचा मृतदेह रात्री साडेआठच्या सुमारास मिळाला. आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.


हे ही वाचा – चीनचे भारताला फुकटचे सल्ले, म्हणे ‘अमेरिका तुम्हाला भडकवतेय’!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -