घरदेश-विदेशराहुल गांधींना बालहक्क आयोगाची नोटीस !

राहुल गांधींना बालहक्क आयोगाची नोटीस !

Subscribe

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना बालहक्क आयोगाकडून नोटीस धाडण्यात आली आहे. जामनेर प्रकरणातील पीडित मुलांची ओळख ट्वीटरच्या माध्यमातून जगभरात उघड केल्याचा आरोप, राहुल गांधी यांच्यावर लावण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी घडलेलं ‘जामनेर’ प्रकरण पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलंय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी जामनेर मारहाण प्रकरणातील पीडितांविषयी भाष्य करणारं एक ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये राहुल जामनेर पीडितांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध बोलले होते.

मात्र, असे असले तरी राहुल यांनी पीडित मुलांच्या मारहाणीचा व्हिडीओ ट्वीटद्वारे शेअर केल्यामुळे, जगभरात या मुलांची ओळख उघड झाल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. पीडित मुलांच्या नातेवाईकांनी यासंदर्भात बालहक्क आयोगाकडे राहुल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असल्याचं समजतंय. दरम्यान याप्रकरणी बालहक्क आयोगाकडून राहुल यांना नोटीस पाठवली आहे. दरम्यान यासंदर्भात राहुल गांधींकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

- Advertisement -

नक्की काय होतं जामनेर प्रकरण?

विहिरीत पोहायला गेले म्हणून जामनेरमधल्या तीन मातंग समाजातील तरुणांना मारहाण करण्यात आली होती. इतकंच नाही तर गावात त्यांची नग्न धिंडही काढण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे त्या मुलांना नग्नावस्थेत मारहाण करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात असलेल्या वाकडी या गावातली ही घटना होती. याप्रकरणी मातंग समाजातील लोकांनी निषेध नोंदवला होता.

सौजन्य- राहुल गांधी, ट्वीटर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -