घरताज्या घडामोडीचीनमध्ये पुन्हा कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा फैलाव, लॉकडाऊन लागण्याची शक्यता

चीनमध्ये पुन्हा कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा फैलाव, लॉकडाऊन लागण्याची शक्यता

Subscribe

जगभरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. जगभरातील सर्व अर्थचक्र पुन्हा एकदा रुळावर आले आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव ओसल्याने सर्वच निर्बंध हटवण्यात आले आहेत. मात्र, असे असताना चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या व्हेरियंट धुमाकुळ घातल्याची माहिती समोर येत आहे.

जगभरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. जगभरातील सर्व अर्थचक्र पुन्हा एकदा रुळावर आले आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव ओसल्याने सर्वच निर्बंध हटवण्यात आले आहेत. मात्र, असे असताना चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या व्हेरियंट धुमाकुळ घातल्याची माहिती समोर येत आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट धोकादायक असून त्याचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे लॉकडाऊनची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत नवीन ट्रॅव्हल गाइडलाइनही जारी करण्यात आल्या आहेत. (Chinese Cities Covid 19 Cases Rise In Shanghai Preventive Steps Strengthened)

चीनमध्ये ओमिक्रॉनचे दोन नवे व्हेरियंट आढळले आहेत. बीएफ.7 आणि बीए.5.1.7 हे दोन नवीन व्हेरियंटमुळं चीनमध्ये अचानक करोनाच्या संख्येत वाढ झाली आहे. 10 ऑक्टोबरला चीनमध्ये कोरोनाचे 2 हजार 89 रुग्ण समोर आले होते. 20 ऑगस्टनंतरचा हा सगळ्यात मोठा आकडा आहे. तसेच, चीनच्या Shenzhen परिसरात बीएफ.७ व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण आहेत.

- Advertisement -

Shenzhen परिसरात रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. परिणामी रुग्णांची संख्या वाढत असताना प्रशासनाने नवीन नियम लागू केले आहेत. Shenzhenमध्ये बाहेरुन नागरिक आल्यानंतर तीन दिवसांच्या आतच त्यांची चाचणी करण्यात येणार आहे. चीनमध्ये कोरोना संसर्ग पुन्हा वाढला आहे. त्यासाठी अनेक कारण समोर येत आहेत.

चीनमध्ये आठवडाभर चालणाऱ्या एका राष्ट्रीय कार्यक्रमासाठी नागरिक एका शहरातून दुसऱ्या शहरात जात होते. त्यामुळे कोरोनाचा प्रसार अधिक वाढला आहे. सद्यस्थितीत चीनमध्ये सातत्याने चाचण्या करण्यात येत आहे. रुग्ण वाढल्यानंतर लॉकडाऊन लावण्यात येते. मात्र, आता रुग्ण वाढले असून, एकाच दिवसात रुग्णसंख्या 2 हजारांवर गेली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईत चायनीज फ्लाइंग कंदिलांच्या वापर, विक्रीवर बंदी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -