घरताज्या घडामोडीवुहानामधील कोरोनाबाबत खुलासा करणाऱ्या महिला पत्रकाराला केले जेरबंद

वुहानामधील कोरोनाबाबत खुलासा करणाऱ्या महिला पत्रकाराला केले जेरबंद

Subscribe

चीनच्या वुहानमधील कोरोना व्हायरस संदर्भात खुलासा करणाऱ्या देशातील सिटिजन पत्रकार झांग झान यांना दोषी ठरवले आहे. पत्रकार आणि वकील झांग यांना ४ वर्षांची जेलची शिक्षा सुनावली आहे. यापूर्वी मे महिन्यांत झांग यांना ताब्यात घेतले होते आणि काही महिन्यांपासून त्याविरोधात उपोषणास बसल्या होत्या. झांगच्या वकीलांनी सांगितले की, ‘त्याची प्रकृती खराब आहे.’

झांग उन सिटीजन पत्रकारमध्ये सामील आहेत. झांग यांनी वुहानमधील कोरोना व्हायरसबाबत खुलासा केला आणि त्या संकटात सापडल्या. चीनमध्ये कोणतेही स्वतंत्र माध्यम नाही आहे आणि चीनी अधिकारी कोरोना व्हायरस संदर्भात चीनी सरकारच्या योजनेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर कारवाई करत आहे. झांग ह्या सोमवारी आपल्या वकीलासोबत शांघायच्या कोर्टात पोहोचल्या होत्या. फेब्रुवारी महिन्यात झांग यांना कोरोनाचा स्वतंत्र अहवाल करण्यासाठी वुहानला पोहोचल्या होत्या. त्यांनी अनेक लाईव्ह व्हिडिओ आणि रिपोर्ट वुहानमधून केले. ज्यानंतर फेब्रुवारी महिन्यांत सोशल मीडियावर हे व्हिडिओ अधिक शेअर झाले. यामुळे चीन अधिकाऱ्यांची याच्यावर नजर पडली आणि झांग त्यांच्या शिकार झाल्या.

- Advertisement -

गेल्या १४ मेपासून झांग वुहानमध्ये बेपत्ता होत्या. एक दिवसापूर्वी खुलासा झाला की, झांग यांना शांघायमधल्या पोसिलांनी ताब्यात घेतले होते. वुहानपासून शांघाय ६४० किमीदूर आहे. नोव्हेंबर महिन्यात त्यांच्या विरोधात औपचारिक रुपात आरोप करण्यात आले होते. झांग यांच्यावर आरोप केला होता की, ‘त्यांनी टेक्स्ट, व्हिडिओ आणि अन्य मीडियावर प्लेटफॉर्मच्या माध्यमातून खोटी माहिती पसरवली आहे.’


हेही वाचा – भारताकडून चीनला जशास तसे उत्तर; चिनी प्रवाशांना भारतात No Entry

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -