घरताज्या घडामोडीIndia COVID: कोरोनाचा हाहाकार! चीन भारताला सर्व स्तरांवर मदत करण्यास तयार

India COVID: कोरोनाचा हाहाकार! चीन भारताला सर्व स्तरांवर मदत करण्यास तयार

Subscribe

संपूर्ण देशभरात कोरोनाने हाहाकार माजला आहे. प्रत्येक दिवसाला कोरोना मृतांची संख्या एक नवा रेकॉर्ड बनवत आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र पाठवले आहे. ज्यामध्ये भारताच्या सद्य स्थितीबाबत संवदेना व्यक्त केल्या आहेत. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी पंतप्रधान मोदींना विश्वास दिला आहे की, या महामारीच्या दरम्यान चीन भारतासोबत सर्व स्तरांवर सहकार्य करण्यास तयार आहे. त्यांनी भारताला महामारी रोगाविरुद्ध लढण्यासाठी सर्व प्रकारच्या मदतीची ग्वाही दिली आहे.

शी जिनपिंग यांनी लिहिले आहे की, ‘भारतामधील असलेली कोरोना महामारीची सद्यस्थिती खूप चिंताजनक आहे. मी चीन सरकार आणि चीनी नागरिकांच्या वतीने भारतीय नागरिक आणि भारत सरकार यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करतो. तसेच भारत सरकार आणि भारत लवकरच या महामारीतून मुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.’

- Advertisement -

दरम्यान देशात आज तब्बल ३ लाख ८६ हजार ८८८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३ हजार ५०१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर देशात आज २ लाख ९५ हजार ४८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या देशात ३१ लाख ६४ हजार ८२५ सक्रिय रुग्णसंख्या आहे. देशातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ८७ लाख ६२ हजार ९७६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २ लाख ८ हजार ३३० जणांचा मृत्यू झाला असून १ कोटी ५३ लाख ८४ हजार ४१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा चौथा आठवडा तर २ लाखांपेक्षा अधिक मृत्यू, राहुल गांधींची केंद्र सरकारवर खोचक टीका


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -