घरदेश-विदेशसीरियावर पुन्हा रासायनिक हल्ला; ९ जणांचा मृत्यू

सीरियावर पुन्हा रासायनिक हल्ला; ९ जणांचा मृत्यू

Subscribe

सीरियावर पुन्हा दहशतवादी हल्ला झाला आहे. अलेप्पो शहरावर दहशतवाद्यांनी रासायनिक हलला केला आहे. या हल्ल्यामध्ये ९ जणांचा मृत्यू तर ५५ जण जखमी झाले आहेत.

सीरियामध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. सीरियाच्या अलेप्पो शहरामध्ये दहशतवाद्यंनी क्लोरीन गॅस हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. क्लोरीन गॅस हल्ल्यानंतर स्थानिक नारिकांना श्वसनाला त्रास होत आहे. सीरियाच्या सैन्य दलाकडून या हल्ल्याला सडेतोड उत्तर दिले जात आहे. सीरियाच्या सैन्यांनी दहशतवाद्यांच्या तळावर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दहशतवाद्यांच्या ताळावर देखील मोठे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

अलेप्पोचा ताबा मिळवण्यासाठी हल्ला

सीरियाया सैन्यांनी २०१६ मध्ये अलेप्पोला दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांपासून मुफ्त केले होते. मात्र पुन्हा अलेप्पो शहरावर ताबा मिळवण्यासाठी दहशतवाद्यांकडून हे हल्ले सुरु आहेत. त्यासाठी दहशतवादी रासायनिक शस्त्रांचा वापर करत आहेत. रुसी सुरक्षा मंत्रालयाने सांगितले आहे की. दहशतवादी २० कंटेनर विषारी क्लोरीन सीरियामध्ये घेऊन आले होते.

जखमींची संख्या वाढतेय

अलेप्पो गव्हर्नर हुसैन दियाब यांनी सांगितले आहे की, क्लोरीन गॅस हल्ल्यामधील जखमींची संख्या वाढत आहे.सीरियावर दहशतवाद्यांनी केलेल्या क्लोरीन गॅस हल्ल्यामध्ये आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे तर ५५ पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. जखमांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -