घरताज्या घडामोडीचित्रपटप्रेमींसाठी आनंदाची बातमी; १५ ऑक्टोबरपासून चित्रपटगृह सुरू होणार, 'हे' आहेत नियम

चित्रपटप्रेमींसाठी आनंदाची बातमी; १५ ऑक्टोबरपासून चित्रपटगृह सुरू होणार, ‘हे’ आहेत नियम

Subscribe

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त होत असला तरी कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. सध्या देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे हळूहळू सर्व उद्योग पुन्हा सुरू केले जात आहेत. दरम्यान आता चित्रपटप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या सात महिन्यापासून बंद असलेले चित्रपटगृह उघडण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. १५ ऑक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेने चित्रपटगृह सुरू होणार आहे. एकाच वेळी एक चित्रपट पाहता येणार आहे. यादरम्यान प्रेक्षकांमध्ये एका सीटचे अंतर ठेवले जाणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी केंद्र सरकारकडून एसओपी (Standard Operating Procedure) जारी करण्यात आली आहे. या नियमांनुसार काही नियम पाळणे अनिवार्य असणार आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यांपासून बंद असलेल्या चित्रपटगृहासंबंधित केंद्राने नियमावली जारी केली आली. तेसच चित्रपट प्रदर्शनासाठी आवश्यक एसओपी देखील केंद्र सरकारने जारी केली आहे.

हे आहे नियम

  • चित्रपटागृहात ५० टक्क्यांपेक्षा अधिक प्रेक्षकांना परवानगी नसावी.
  • प्रत्येक व्यक्तीला मास्क परिधान करणं बंधनकारक आहे.
  • चित्रपटगृहात बसताना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
  • ज्या ठिकाणी प्रेक्षकांना बसता येणार नाही त्या सीट्वर मार्क करणे आवश्यक आहे.
  • प्रेक्षकांसाठी हँडवॉश आणि सॅनिटायझर पुरवण्यात यावे.
  • प्रेक्षकांच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू App असणे आवश्यक आहे.
  • थर्मल स्क्रिनिंग करणे.
  • तसेच लक्षणे नसणाऱ्या प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार आहे.
  • कोणताही आजार असल्यास त्याबाबत अहवाल देणे.
  • मध्यांतरामध्ये इतरत्र जाणे प्रेक्षकांनी टाळावे.
  • नियमित स्वच्छता आणि सॅनिटायझेशन केले जावे.
  • कोणतेही पेमेंट करता डिजिटल पद्धतींना प्रोत्साहन द्यावे.
  • तसेच सोशल डिस्टन्सिंगकरिता जागोजागी मार्किंग केले जावे.
  • तिकिट खरेदी पूर्ण दिवसासाठी सुरू असावी.
  • तसेच गर्दी टाळण्यासाठी आगाऊ तिकिट बुकिंगची सेवा द्यावी.
  • थुंकण्यास सक्त मनाई केली असून खोकताना, शिंकताना खबरदारी घेणे गरजेचे आहे.
  • पॅकेज फूड आणि पेय घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.
  • पण चित्रपटगृहामध्ये फूड डिलीव्हरीला परवानगी नाही आहे.
  • आवश्यकता भासल्यास कॉन्टॅक्ट ट्रॅकिंगसाठी मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे.
  • तसेच प्रेक्षकांमध्ये एका सीटचे अंतर ठेवले जाणार आहे.
  • चित्रपटगृहातील स्टाफमध्ये सुरक्षा असणे आवश्यक आहे.
  • हॉलमधील एसीचे तापमान २४ ते ३० अंश सेल्सिअस असावे.
  • Do’s and Don’ts असे चित्रपटगृहातील आवारात लावण्यात यावे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -