घरताज्या घडामोडीजम्मू काश्मीरच्या किश्तवाड येथे ढगफुटीमुळे ७ जणांचा मृत्यू, १७ जणांना वाचवण्यात यश

जम्मू काश्मीरच्या किश्तवाड येथे ढगफुटीमुळे ७ जणांचा मृत्यू, १७ जणांना वाचवण्यात यश

Subscribe

अतिमुसळधार पावसामुळे जम्मू काश्मीरमध्ये पूर येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे भूस्खलन आणि अनेक सखोल भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरमधील लोकांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील ढगफुटी होऊन मोठी दुर्घटना झाली आहे. या ढगफुटीत गावातील ७ जणांचा मृत्यू झाला असून १७ जणांना वाचवण्यात करण्यात आले आहे. ( cloudburst at Kishtwar in Jammu and Kashmir 7 killed, 17 rescued)  तर ३०-४० हून अधिक जण अद्याप बेपत्त असल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारी सकाळी ४:२० वाजताच्या सुमारास ढगफुटीमुळे गावातील अनेक घरे संकटात आली. ढगफुटीनंतर अनेक जण बेपत्ता झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. रेस्क्यू ऑपरेशन करुन आतापर्यंत १७ जणांना बाहेर काढण्यात यश आले असून अद्याप रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.

- Advertisement -

किश्तवाड जिल्ह्यात ढगफुटी झाली त्याचवेळी तिथले चार पूल देखील वाहून गेले आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत सापडलेल्या मृतदेहांची ओळख पटवण्यात आलीये. सज्ज बेगम (६५ वर्षे), रकिता बेगम (२४ वर्षे), एक खानाबदोश, गुलाम नवी तांत्रे (४२ वर्षे) आणि अब्दुल मजीद (४२वर्षे) या व्यक्तींचा समावेश आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ढगफुटीमुळे जवळपास ५-६ घरांचे प्रचंड नुकसान झाले. यात ३०-४० लोक वाहून गेले आहेत. आतापर्यंत ७ जणांचे मृतदेह आमच्या हाती लागले असून ३० हून अधिक लोक बेपत्ता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, जम्मू काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडत आहेत. पुंछ,राजौरी, रियासी आणि आजूबाजूच्या परिसरात अतिमुसळधार पाऊस सुरु आहे. ३० जुलैपर्यंत पाऊस होण्याची शक्यता हवामानखात्याकडून वर्तवण्यात आलीय. तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. अतिमुसळधार पावसामुळे जम्मू काश्मीरमध्ये पूर येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे भूस्खलन आणि अनेक सखोल भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरमधील लोकांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पोलीस आणि हवामान विभागाचे आवाहन

- Advertisement -

पुढील २-३ दिवस पावसाचा विचार केला असता किश्तवड सारख्या दुर्घटना होण्याची शक्यता आहे. अशा आप्तकालीन परिस्थितीत लोकांना मदत करण्यासाठी काही हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. एसएसपी किश्तवाड ९८१९१९२०२, Adl.SP किश्तवाड ९४६९१८१२५४, डिप्टी. एसपी मुख्यालय ९६२२६४१९८, एसडीपीओ एथोली ९८५८५१२३४८ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन पोलीस आणि हवामान विभागाने केले आहे.

गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत म्हटले आहे की, किश्तवाड येथे ढगफुटीमुळे झालेल्या दुर्घटनेबाबत जम्मू काश्मीरच्या LG आणि DGP यांच्यासोबत बातचीत केली. SDRF, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने बचाव कार्य सुरु करण्यात आले असून, NDRFचे जवान देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. अधिकाधिक लोकांना वाचवणे ही आमची प्राथमिकता आहे. दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

हिमाचलमध्ये पूरामुळे ९ जणांचा मृत्यू

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, कुल्लू आणि लाहौल स्पीती जिल्ह्यात पुरामुळे ९ जणांचा मृत्यू झालाय. तर ७ जणा अद्याप बेपत्ता आहेत.


हेही वाचा – कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सौदी अरेबियाने भारताला टाकलं ‘रेड लिस्ट’ मध्ये

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -