रशियात शिवजयंती साजरी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी साधला संवाद

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यभरात आणि राज्याबाहेर सुद्धा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रशियात देखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घेत थेट रशियात व्हिडीओ काॅल करत शिवजयंती साजरी करणाऱ्या तरुणांचे कौतुक केले.

CmM Eknath Shinde interacted with students celebrating Shiv Jayanti in Russia

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यभरात आणि राज्याबाहेर सुद्धा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रशियात देखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घेत थेट रशियात व्हिडीओ काॅल करत शिवजयंती साजरी करणाऱ्या तरुणांचे कौतुक केले.

रविवारी राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. राज्यासह देशभरात आणि देशाच्या बाहेर सुद्धा जयंती साजरी केली गेली. सातासमुद्रापार म्हणजेच रशियामध्ये असलेल्या ओशत स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या तरुणांनी युनिव्हर्सिटीच्या प्रांगणात शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. या युनिव्हर्सिटीमध्ये ७५० मराठी तरुण हे वैद्यकीय शिक्षण घेत आहेत.

युनिव्हर्सिटीच्या प्रांगणात साजरी केल्या जाणाऱ्या शिवजयंतीची मुख्यमंत्री महोदयांनी दखल घ्यावी अशी या डाॅक्टर विद्यार्थ्यांची इच्छा होती. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हीसीद्वारे त्यांच्याशी संवाद साधला अन् त्यांची ही इच्छा पूर्ण झाली.

“आपण आपल्या मातृभूमीपासून लांब राहूनही शिवजयंतीचा सण साजरा करत आहात हे निश्चितच कौतुकास्पद आहे. मी स्वतः देखील आग्र्यामधील लाल किल्ल्यावर साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती सोहळ्यासाठी जात असून स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच अशाप्रकारे शिवजयंती साजरी केली जात आहे. मात्र तुम्ही सगळ्यांनी आपला अभ्यास आणि बाकीच्या गोष्टी सांभाळून शिवजयंती साजरी करत आहात हे खरच फार मोठी गोष्ट असून तुम्हा सर्वांना मी शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो,” असे मुख्यमंत्र्यांनी या भावी डॉक्टरांना सांगितले.

हेही वाचा – अंबानी आणि अदानींपेक्षा माझा वेळ अधिक मौल्यवान, बाबा रामदेवांचं मोठं वक्तव्य

मुख्यमंत्र्यांशी झालेल्या या संवादामुळे सातासमुद्रापार शिवप्रेम व्यक्त करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या या वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. आपला शिवजयंतीचा उत्साह द्विगुणित केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.