टार्गेट पुर्ण झालं नाही…कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली जिवंत किडे खाण्याची शिक्षा!

ही घटना चीनच्या एका इंटिरीयर डिझायनर कंपनीत घडली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली जिवंत किडे खाण्याची शिक्षा

जगभरात कोरोनाचा वेगाने पसार होत आहे. या दरम्यान केवळ अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद आहेत. मात्र आता काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये शिथीलता करण्यात आली आहे. तरी कर्मचारी वर्ग घरून काम करत आहेत. असे असूनही सर्व प्रकारात एक कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना टार्गेट पुर्ण न झाल्यामुळे जिवंत किडे खाण्याची शिक्षा दिली आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत कंपनीने कर्मचाऱ्यांना जिवंत किडे खायला दिल्याचे दिसत आहे. यात काही कर्मचारी पाण्याबरोबर हे किडे गिळताना दिसत आहेत. कंपनीने काही कर्मचाऱ्यांना जिवंत किडे खाण्याची तर काही कर्मचाऱ्यांना जिवंत मासे खाण्याची शिक्षा तर काहींना टॉयलेट साफ करण्याची शिक्षा दिला आहे.

ही घटना चीनच्या एका इंटिरीयर डिझायनर कंपनीत घडली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही शिक्षा देण्याआधी कर्मचाऱ्यांची परवानगी घेतल्याचं सारवासारव कंपनीने कडून करण्यात आलं. सुरूवातीला कर्मचाऱ्यांना कंपनी आपल्याबरोबर गम्मत करतेय असं वाटलं पण नंतर त्यांना यातील गंभीरता समजली.

कंपनीकडून देण्यात आलेल्या नियमांमध्ये शेवटच्या नियमांमध्ये अशा कठोर शिक्षांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचबरोबर ज्यांनी ही शिक्षा पुर्ण केली नाही त्यांनी ७० डॉलर भरण्याचा पर्याय देण्यात आला होता. कर्मचाऱ्यांपैकी अनेकजण पैसे भरू शकत नव्हते. म्हणून त्यांनी किडे खाण्याचा पर्याय निवडला.


हे ही वाचा – ऑनलाईन क्लास अटेंड करायला मिळाला नाही, तीने स्वत:ला जाळून घेतलं!