घरअर्थजगतबँकांनी वाढवला FD वरील व्याजदर, कशात पैसे गुंतवल्यास मिळू शकेल चांगला रिटर्न

बँकांनी वाढवला FD वरील व्याजदर, कशात पैसे गुंतवल्यास मिळू शकेल चांगला रिटर्न

Subscribe

खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी आणि आयसीआयसीआय या दोन बड्या बँकांनी त्यांच्या मुदत ठेवीं (FD) वरील व्याजदरात मोठी वाढ केली आहे. यामुळे आत्ता एफडीच्या मॅच्युरिटीवर ग्राहकांना अधिक रिटर्न मिळू शकणार आहे. एचडीएफसी आणि आयसीआयसीआय या बँकिंग क्षेत्रातील दिग्गजांपैकी एक आहेत. आता या बँकांची थेट टक्कर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) या सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांशी होणार आहे. नेमकं तिन्ही बँकांच्या वेगवेगळ्या कालावधीच्या एफडीवरील व्याजदरावर काय आहे जाणून घेऊ. यातून तुम्ही स्वतःसाठी एक चांगला पर्याय निवडू शकता.

व्याजदरांवरील बदलांमुळे आता HDFC बँक ७ दिवसांपासून ते १० वर्षांच्या कालावधीसाठी २.५० टक्के ते ५.५० टक्के व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या FD बद्दल सांगायचे झाल्यास HDFC बँक ७ दिवसांपासून ते १० वर्षांच्या कालावधीसाठी ३ टक्के ते ६.२५ टक्के व्याज देत आहे. हे दर १ डिसेंबर २०२१ पासून लागू झाले आहेत.

- Advertisement -

त्याचप्रमाणे ICICI बँकेनेही आपल्या व्याजदरात बदल केला आहे. ७ दिवस ते १० वर्षांसाठी बँक २.५ टक्के ते ५.५ टक्के व्याजदर देत आहे, तर ५० बेसिक पॉइंट्स (BPS) ज्येष्ठ नागरिकांसाठी जास्त व्याजदर देत आहे.

HDFC बँक मुदत ठेव दर (FD)

एचडीएफसी बँक २ कोटी रुपयांपेक्षा कमी FD वर खालील प्रकारे व्याज देते – ७ ते १४ दिवसांसाठी सामान्य लोकांसाठी २.५० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ३.०० टक्के, १५ ते २९ दिवसांसाठी २.५० ते ३.०० टक्के, ३०-४५ दिवसांसाठी ३ ते ३.५० टक्के, ४६-६० दिवसांसाठी ३ टक्के ते ३.५० टक्के, ६०- ९० दिवसांसाठी ३ टक्के ते ३.५० टक्के, ९१ दिवस ते ६ महिन्यांसाठी ३.५० ते ४ टक्के, ६ महिने १ दिवस ते ९ महिन्यांसाठी ४.४० ते ४.६० टक्के, ९ महिने ते १ दिवस ते १ वर्षापेक्षा कमीसाठी ४.४० ते ४.९० टक्के, १ वर्षासाठी ४.९० ते ५.४० टक्के, १ वर्ष ते १ दिवस ते २ वर्षांसाठी ५.१५ ते ५.६५ टक्के, २ वर्षे ते १ दिवस ते ३ वर्षांपर्यंत ५.६५ ते ४.७५ टक्के, ३ वर्षे १ दिवस ते ५ वर्षांसाठी ५.३५ ते ४.८५ टक्के. ५ वर्षे ते १ दिवस ते १० वर्षांसाठी ५.५० टक्के ते ज्येष्ठ नागरिकांसाठी ६.२५ टक्के.

- Advertisement -

ICICI बँकेचे मुदत ठेवीचे दर (FD)

ICICI बँक २ कोटी रुपयांपेक्षा कमी FD वर खालीलप्रमाणे व्याज देते: ७ ते १४ दिवसांसाठी २.५० ते ३.०० टक्के, २९ दिवसांसाठी २.५० ते ३.०० टक्के, ४५ दिवसांसाठी ३.०० ते ३.५० टक्के, ४६ ते ६० दिवसांसाठी ३.०० ते ३.५० टक्के, ६१ दिवसांपासून ते ९० दिवसांपर्यंत ३.०० ते ३.५० टक्के, ९१ दिवस ते १२० दिवसांसाठी ३.५० ते ४.०० टक्के, १२१ दिवसांपासून ते १५० दिवसांसाठी ३.५० ते४.०० टक्के, १५१ ते १८४ दिवसांसाठी ३.५० ते ४.०० टक्के, १८५ दिवसांपासून ते २१० दिवसांपर्यंत ४.४० ते ४.९० टक्के, २११ दिवसांपासून ते २७० दिवसांपर्यंत ४.४० ते ४.९० टक्के, २७१ दिवसांपासून ते २८९ दिवसांपर्यंत ४.४० ते ४.९० टक्के, २९० दिवसांपासून ते १ वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी ४.४० ते ४.९० टक्के, १ वर्षापासून ते ३८९ दिवसांपर्यंत ४.९० ते ५.४० टक्के, ३९० दिवसांपासून ते १५ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी ४.९० ते ५.४० टक्के, १५ महिन्यांपासून ते १८ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी ४.९० ते ५.४० टक्के, १८ महिने ते २ वर्षांपर्यंत ५ ते ५.५० टक्के, २ वर्ष १ दिवस ते ३ वर्षांपर्यंत ५.२० ते ५.७० टक्के, ३ वर्ष १ दिवस ५ वर्षापर्यंत ५.४० ते ५.९० टक्के, ५ वर्ष १ दिवस ते १० वर्षांपर्यंत ५.६० ते ६.३० टक्के, ५ वर्षांपासून (80 C FD) अधिकतम १.५० लाख पर्यंत ५.४० ते ५.९० टक्के

SBI मुदत ठेव दर (FD)

SBI २ कोटी रुपयांपेक्षा कमी FD वर खालीलप्रमाणे व्याज देते: ७ दिवस ते ४५ दिवसांपर्यंत २.९ ते ३.४ टक्के, ४६ दिवसांपासून ते १७९ दिवसांपर्यंत ३.९ टक्के ते ४.४ टक्के, १८० दिवसांपासून ते २१० दिवसांपर्यंत ४.४ ते ४.९ टक्के, २११ दिवसांपासून १ वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी ४.४ ते ४.९ टक्के, १ वर्षांपासून २ वर्षांपर्यंत ५ ते ५.५ टक्के, २ वर्षांपासून ते ३ वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी ५.१ ते ५.६ टक्के, ३ वर्षांपासून ते ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी ५.३ ते ५.८ टक्के, ५ वर्षांपासून ते १० वर्षांपर्यंत ५.४ ते ६.२ टक्के.

योग्य वेळ निवडून गुंतवणूक करणे महत्वाचे

FD वरील व्याजदर वेळोवेळी बदलत असतात. त्यामुळे FD च्या माध्यमातून ठरावीक कालावधीत गॉरंटी रिटर्न मिळतो, त्यामुळे अनेक तज्ञ याला गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय मानतात. विशेषत: ज्यांना त्यांचे पैसे कोणत्याही धोक्याशिवाय गुंतवणूक करायचे आहेत. त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधीआहे.

कोणत्याही बँकेत एफडीमध्ये पैसे गुंतवताना नेहमी योग्य कालावधी निवडावा. मुदतपूर्तीपूर्वी एफडी तोडल्यास तुम्हाला दंडही भरावा लागू शकतो. दंडाच्या बाबतीत, व्याजदर खूपच कमी होतो. यापूर्वी एफडीचे व्याजदर सातत्याने घसरत होते, त्यामुळे जोखीमविरहीत गुंतवणूकदारांना आपले पैसे कुठे ठेवायचे असा प्रश्न होता, परंतु व्याजदरात झालेल्या वाढीनंतर आता गुंतवणूकदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असेल.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -