घरदेश-विदेशकाश्मिरींना पैसे देऊन भेटताय डोवल; गुलाम नबी आझादांची टीका

काश्मिरींना पैसे देऊन भेटताय डोवल; गुलाम नबी आझादांची टीका

Subscribe

वादग्रस्त वक्तव्यानंतर आझाद यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी भाजपाने नेते शाहनवाज हुसैन यांनी केली आहे.

कलम ३७० रद्द केल्यानंतर केंद्र सरकारकडून जम्मू काश्मीरमधील तणावाची परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी स्वतः राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बुधवारी शोपियांमध्ये सर्वसामान्य काश्मिरी जनतेची भेट घेऊन जनतेशी संवाद साधला. त्यांच्या या भेटीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणावरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पैसे देऊन लोकांना सोबत घेत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या वक्तव्यानंतर आझाद यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी भाजपाने नेते शाहनवाज हुसैन यांनी केली आहे.

- Advertisement -

३७० कलम हटविण्याच्या व जम्मू-काश्मीरला वेगळे करण्याच्या निर्णयानंतर काश्मीरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. तेथील वातावरण लवकरात लवकर निवळून परिस्थिती पूर्वपदावर यावी म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. बुधवारी स्वतः राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी शोपियानमधील काही नागरिकांची भेट घेऊन त्यांच्यासोबत जेवणही घेतले.

- Advertisement -

डोवल यांचे ते फोटो सर्वत्र व्हायरल झाले आहेत. याबाबत आझाद यांना विचारलं असता, ‘पैसे देऊन तुम्ही कोणालाही सोबत घेऊ शकता,’ असे ते म्हणाले. ‘काश्मीरमध्ये कर्फ्यू लावून कायदा बनवला गेला. भारताच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलंय,’ असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -