घरदेश-विदेशमोदींची मुलाखत म्हणजे खोदा पहाड, निकला चुहा - काँग्रेस

मोदींची मुलाखत म्हणजे खोदा पहाड, निकला चुहा – काँग्रेस

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीनंतर काँग्रेसने त्यांच्या मुद्द्यांना तीव्र आक्षेप घेत पंतप्रधानांना काही सवाल केले आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेमध्ये हे मुद्दे उपस्थित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीनंतर काँग्रेसने मोदींवर टीका केली आहे. मोदींच्या मुलाखतीनंतर लागलीच सुरू झालेल्या काँग्रेसच्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदींच्या मुलाखतीवर टोकदार टीका केली. ‘मोदींची मुलाखत म्हणजे खोदा पहाड और निकला चुहा’, अशा शब्दांत त्यांनी मोदींच्या मुलाखतीची खिल्ली उडवली. त्याशिवाय ‘मोदीजी तुमची उलटी गिनती सुरू झाली आहे’, असं देखील सुरजेवाला यावेळी म्हणाले. त्यासोबतच काँग्रेसकडून मोदींना काही प्रश्न देखील विचारण्यात आले आहेत.

काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आलेले मुद्दे

  • १५ लाख लोकांच्या खात्यात आले की नाही?
  • ८० लाख कोटींचा काळा पैसा जो १०० दिवासांत येणार होता, तो ५५ महिन्यांत आला का नाही?
  • २ कोटील रोजगार प्रत्येक वर्षी म्हणजे ५५ महिन्यांत ९ कोटी रोजगार येणार होते. त्यातले ९ लाख तरी आळे का?
  • शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान देणार होतात. फायदा तर दूर, मुद्दल सुद्धा सुटेना. त्याचं काय झालं?
  • व्यापार सोपा करणार होते. पण जीएसटी लावून धंदा मंदा आणि व्यापार चौपट करून टाकला
  • नोटबंदीमुळे जनतेची लूट झाली, त्याचं उत्तर काय आहे?
  • गेल्या ५५ महिन्यांमध्ये जम्मू काश्मीरमध्ये ५२८ जवान शहीद धाले. नक्षलवाद्यांनी ३२८ जवानांना मारलं. देशाची आणि जवानांची सुरक्षा धोक्यात घातलीत. त्याचं काय उत्तर आहे?
  • भ्रष्टाचाराचं काय झालं. राफेल ते सामान्यांचं जीवन. राफेलमध्ये जर काहीच चुकीचं नाही, तर संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीला पाठ का?
  • गंगेच्या स्वच्छतेचं काय झालं. ३९ ते ३८ ठिकाणी अजूनही गंगेची स्वच्छता झालेली नाही. नीती आयोगाच्या मते उत्पादनाचा दर ०.५ टक्केच आहे. आता तर देशात कच्च्या तेलाच्या किंमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कमी होऊन सुद्धा पेट्रोलच्या किंमती वाढलेल्या आहेत. त्याचं काय स्पष्टीकरण द्याल?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -