घरदेश-विदेशकाँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण? राहुल-प्रियंकाचा पत्ता कट, 'या' नेत्याची लागणार वर्णी?

काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण? राहुल-प्रियंकाचा पत्ता कट, ‘या’ नेत्याची लागणार वर्णी?

Subscribe

गांधी कुटुंबातीलच व्यक्ती काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होणार की गांधी कुटुंबाव्यतिरिक्त नेत्याला काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा देण्यात येणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

नवी दिल्ली – काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा (President of Congress) पेच अद्यापही कायम आहे. अध्यक्षपदासाठी राहुल गांधी (Rahul Gandhi) निरुत्साही असून हंगामी अध्यक्ष असलेल्या सोनिया (Sonia Gandhi) गांधी आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. गांधी कुटुंबातीलच व्यक्ती काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होणार की गांधी कुटुंबाव्यतिरिक्त नेत्याला काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा देण्यात येणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. दरम्यान, काँग्रेसच्या अध्यक्षपदाकरता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचं नाव चर्चेत आहे. तसेच, अशोक गेहलोत यांनी अध्यक्षपदाची सुत्रे हाती घ्यावीत असा प्रस्ताव खुद्द सोनिया गांधींनी ठेवला असल्याचीही चर्चा आहे.

हेही वाचा – सोनिया गांधी वैद्यकीय तपासणीसाठी ब्रिटनला; राहुल गांधी प्रियंका गांधीही जाणार सोबत

- Advertisement -

सोनिया गांधी यांनी २०१० साली काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधी यांचे पूत्र राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खालल्यानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत आहेत. मात्र, आता त्यांची प्रकृती साथ देत नसल्याने त्या उपचारांसाठी राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत परदेशात जाणार आहेत. या काळात काँग्रेसची धुरा कोणाच्या हाती येणार यावर सर्वत्र चर्चा सुरू आहे. दरम्यान, राजस्थानचे अशोक गेहलोत यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. सोनिया गांधी यांनी स्वतःहून अशोक गेहलोत यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवला आहे.

सोनिया गांधी उपचारांसाठी परदेशात जाणार आहेत. त्याआधीच सोनिया गांधी अशोक गेहलोत यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा देण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेलहोत यांच्याकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, गांधी कुटुंबीयांव्यतिरिक्त काँग्रेसचा अध्यक्ष होणार असल्याने सर्वांनी भूवया उंचावल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – हा महिलांचा सन्मान आहे का?, बिल्किस बानोप्रकरणी पवारांचा मोदी सरकारला सवाल

राहुल गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवावे अशी इच्छा अशोक गेहलोत यांनी व्यक्त केली होती. राहुल गांधी यांनी त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा असं आवाहन गेहलोत यांनी केलं होतं. दरम्यान, अशोक गेहलोत अध्यक्ष होणार असल्याची माहिती केवळ माध्यमांवरून समोर येत आहेत. याबाबत आपल्याला अधिकृत काहीही माहिती नाही. पक्षश्रेष्ठी जी जबाबदारी देतील ती स्विकारण्यास तयार आहे, असंही अशोक गेहलोत म्हणाले.

पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री म्हणाले होते की, “काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अंतिम तारीख मंजूर करणे हे काँग्रेस कार्यकारिणीवर अवलंबून आहे, परंतु आमच्या बाजूने आम्ही तयार आहोत.”

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -