घरदेश-विदेशचक्क कोरोनाच्या अँटिबॉडीजसह बाळाचा झाला जन्म

चक्क कोरोनाच्या अँटिबॉडीजसह बाळाचा झाला जन्म

Subscribe

नवजात बालकाच्या शरीरात अँटिबॉडिज आढळल्याची ही संपूर्ण जगातील पहिली घटना आहे.

जगात अनेक अद्भुत गोष्टी घडत असून, त्यात आता अमेरिकेत एक नवा प्रकार घडला आहे. जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या सावटानंतर अनेक अनोख्या गोष्टी जगासमोर आल्या आहेत. अमेरिकेत अशा नवजात बालकाचा जन्म झाला की, त्या बालकाच्या शरीरात कोरोनाच्या अँटिबॉडिज असल्याचा दावा केला जात आहे. बालरोगतज्ज्ञांनी ही घटना सकारात्मक असल्याचे सांगितले आहे. कोरोनाच्या अँटिबॉडिजसह बाळाचा जन्म ही जगात पहिल्यांदाच घडलेली घटना आहे. या घटनेचा शोध घेतला असता, या नवजात बाळाच्या आईला गरोदर असताना लसीचा पहिला डोस देण्यात आला होता. लसीचा डोस घेतल्यानंतर महिलेने लगेचच तीन आठवड्यातच नवजात बालकाला जन्म दिला . या महिलेला गरोदरपणाच्या ३६ व्या आठवड्यात मॉर्डना या लसीचा डोस देण्यात आला आहे. परंतु या नवजात बालकाच्या या अनोख्या प्रकाराचे अन्य दुसरेही कारण असू शकते, यावर आता संशोधन केले जात आहे. मात्र त्या बालकाच्या आईने लस घेतली हे बाळाच्या शरीरात अँटिबॉडिज आढळल्याचे पहिले कारण आहे. आता संशोधनात याचे आणखीही कारण समोर येण्याची शक्यता आहे.

ज्या महिला कोरोना पॉझिटिव्ह होत्या त्यात त्या गरोदरदेखील होत्या, अशा महिला कोरोनामुक्त झाल्या असल्या तरी, त्याच्या बाळाला कोरोनाची लागण होऊ नये याकरीता बाळाची आईशी जोडलेली नाळ उपयोगी पडेल, असे संशोधकांना वाटले होते. मात्र बाळाच्या शरीरात अँटिबॉडिज पोहोचवण्यात आईशी जोडलेली नाळ अयशस्वी ठरली. परंतु आता या अनोख्या प्रकारानंतर बाळाच्या आईला कोरोनाची लस दिल्याने नवजात बालकाच्या शरीरात अँटिबॉडिज जाण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा – दहावी, बारावीचा अभ्यासक्रम ५० टक्क्यांनी कमी करण्याची विद्यार्थ्यांची मागणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -