घरताज्या घडामोडीCoronavirus: लस तयार झाल्यानंतरही कोरोना व्हायरस नष्ट होणार नाही - वैज्ञानिक

Coronavirus: लस तयार झाल्यानंतरही कोरोना व्हायरस नष्ट होणार नाही – वैज्ञानिक

Subscribe

वैज्ञानिकांच्या एका अहवालानुसार ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

जगात कोरोना व्हायरसचा फैलाव झपाट्याने होत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा देखील वाढताना दिसत आहे. अनेक देश कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी लस आणि औषधाच्या शोधात गुंतले आहेत. मात्र यादरम्यान वैज्ञानिकांनी एक अहवाला दिला आहे. ज्यात असे म्हटले आहे की, ‘लस तयार झाल्यानंतरही कोरोना व्हायरस कधीही संपू शकत नाही.जसे की एचआयव्ही, चिकन पॉक्स आणि गोवर सारखे आजार.

वॉशिंग्टन पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, महामारी रोगांच्या तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, कोविड-१९ दीर्घकाळ जगणे, अमेरिकेच्या पुढच्या टप्प्यातील महामारीच्या संशोधनासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. काही गोष्टींमध्ये कोरोना व्हायरस जिवंत राहत आहे. त्यामुळे भविष्यात याचा परिणाम होऊ शकतो. सध्या चार स्थानिक कोरोना व्हायरस आहे. पण कोविड-१९ पाचवा असेल, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.

- Advertisement -

शिकागो विद्यापीठातील विकासात्मक जीवशास्त्रज्ञ आणि महामारी विशेष तज्ज्ञ सारा कोबे म्हणाल्या की, हा व्हायरस बराच काळ टिकून राहिल. त्यामुळे आपण यातून कसे सुरक्षित राहू शकतो असा आता प्रश्न आहे. त्यांच्या मते, या महामारी सोबत लढण्यासाठी सतत प्रयत्न करणे आणि राजकीय इच्छाशक्ती आवश्यक आहे. रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्राचे माजी संचालक टॉम फ्रीडेन म्हणाले की, ‘सध्या आपण जास्त लक्ष देत नसल्यामुळे परिस्थिती गंभीर होत आहे. आता जे आपण करत आहोत ते फक्त आपत्कालीन पाऊल आहे.’

आतापर्यंत जगातील कोरोनाबाधितांचा आकडा ५९ लाख चार हजार ६५८वर पोहोचला आहे. त्यापैकी तीन लाख ६२ हजार १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर २५ लाख ७९ हजार ६२९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण अमेरिकेत आढळले आहेत. अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा आकडा १७ लाख ५८ हजार ४२२वर पोहोचला असून मृतांचा आकडा एक लाख दोन हजार ९१७ झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोनामुक्ती करता १०० देशात केले जाणार ‘यज्ञ’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -