घरCORONA UPDATECorona: रुग्णाचा सकारात्मक दृष्टीकोन; कोरोनाबाधित असतानाही करतोय नृत्य

Corona: रुग्णाचा सकारात्मक दृष्टीकोन; कोरोनाबाधित असतानाही करतोय नृत्य

Subscribe

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने पसरत आहे. अशात या आजारावर अजून कोणताही उपाय आलेला नाही. कोरोनाची लस बनवण्यात अद्याप कोणत्याही देशातील संशोधकांना यश आलेले नाही. मात्र असे असतानाही काही कोरोनाबाधित रुग्ण असे आहेत, ज्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवला आहे. आजारावर ठराविक औषधं आले नसले तरी अनेक रुग्ण हे कोरोनामुक्त होत आहे. ते केवळ प्रबळ इच्छाशक्ती, डॉक्टर करत असलेले उपचार आणि सकारात्मक दृष्टीकोन. असाच एक अवलिया रुग्ण कोरोनाबाधित असतानाही जलंदरच्या एक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना भांगडा हे नृत्य करून आपला ताण दूर करत आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाने ‘रोजा’बाबत विचार करावा – महापौर

- Advertisement -

पंजाबमधील जलंदर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये हा भांगडा करत इतरही रुग्णांना सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचा संदेश देत आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधित रुग्ण हॉस्पिटलच्या बेडवर चढून पंजाबी गाण्यांवर नृत्य करत असल्याचे पाहायला मिळाले होते. आता पुन्हा एकदा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -