घरटेक-वेकएअरटेलच्या या रिचार्ज पॅकसह मिळणार Disney+ Hotstar VIP चं सबस्क्रिप्शन मोफत

एअरटेलच्या या रिचार्ज पॅकसह मिळणार Disney+ Hotstar VIP चं सबस्क्रिप्शन मोफत

Subscribe

सबस्क्रिप्शनमुळे सिनेमा, मूव्ही, स्पोर्ट्स, डिस्नी मधील किड्स कंटेंटमध्ये पहायला मिळणार आहे.

भारती एअरटेलने ४०१ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज पॅक बाजारात आणला आहे. या प्रीपेड रिचार्ज पॅकसह एअरटेलच्या ग्राहकांना एक वर्षासाठी डिस्नी + हॉटस्टार व्हीआयपी (Disney+ Hotstar VIP) सबस्क्रिप्शन मिळेल. नवीन एअरटेल प्रीपेड योजना २८ दिवसांच्या वैधतेसह ३ जीबी डेटा मिळेल. लॉकडाऊनमुळे डिस्नी, हॉटस्टार, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि नेटफ्लिक्स या अॅपचा वापर वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर एअरटेलने ही योजना बाजारात आणली आहे.

४०१ रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज योजनेची एअरटेल वेबसाइटवर एक वर्षाची डिस्नी + हॉटस्टार व्हीआयपी सबस्क्रिप्शन मिळणार आहे. सबस्क्रिप्शनमुळे सिनेमा, मूव्ही, स्पोर्ट्स, डिस्नी मधील किड्स कंटेंटमध्ये पहायला मिळणार आहे. यासह भारतीय टीव्ही शो आणि चित्रपटदेखील पाहता येतील.

- Advertisement -

हेही वाचा – 48 मेगापिक्सल कॅमेरासह Realme X50m 5G लाँच


डिस्नी + हॉटस्टार व्हीआयपी सबस्क्रिप्शनची वैधता एक वर्षाची आहे. ४०१ रुपयांच्या एअरटेल प्रीपेड योजनेची वैधता संपल्यानंतरही आपणास या सेवेचा लाभ घेता येणार आहे.

- Advertisement -

इतर फायदे

डिस्नी + हॉटस्टार व्हीआयपी सदस्यता वगळता, ग्राहकांना एअरटेलच्या प्रीपेड योजनेत ४०१ रुपयांच्या वापरासाठी ३ जीबी डेटा मिळतो. वैधता २८ दिवस आहे. ही योजना एअरटेलच्या वेबसाइटवरील डेटा विभागात उपलब्ध आहे. यामध्ये व्हॉईस कॉलिंग किंवा एसएमएस सुविधा नाही. या व्यतिरिक्त वापरकर्ते एअरटेलच्या अ‍ॅप किंवा इतर कोणत्याही साइटवरून या प्लॅनचं रिचार्ज करू शकतात.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -