घरCORONA UPDATECoronavirus: चहा उशीरानं मिळाला म्हणून करोनाग्रस्ताने लगावली नर्सच्या कानशिलात

Coronavirus: चहा उशीरानं मिळाला म्हणून करोनाग्रस्ताने लगावली नर्सच्या कानशिलात

Subscribe

आरोपी रुग्णाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. आतापर्यंत देशात करोनाचे ५६२ रुग्ण आढळले आहेत. तर १० जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाग्रस्तांचा संपर्क इतरांशी येऊ नये म्हणून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. विलगीकरण कक्षात या रुग्णांची काळजी घेण्यासाठी नर्स आणि वॉर्डबॉय यांची नियूक्ती करण्यात आली आहे. मात्र, या विलगीकरण कक्षात अनेक रुग्ण नर्स आणि वॉर्डबॉयला सहकार्य करत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. अशीच एक घटना केरळमध्ये घडली आहे. विलगीकरण कक्षात असलेल्या रुग्नाने नर्सवर हल्ला केला आहे.

केरळमधल्या कोल्लममध्ये विलगीकरण कक्षात असलेल्या रुग्णाने नर्सच्या कानशिलात लगावली असल्याचे समोर आले आहे. रुग्णाला चहा उशिराने मिळाला म्हणून त्याने नर्सच्या कानशिलात लगावली. मस्कतवरून परतलेल्या करोनाग्रस्ताला रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, आरोपी रुग्णाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान, देशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशाला लॉकडाऊन करण्यात आले आहे. आतापर्यंत देशात करोनाचे ५६२ रुग्ण आढळले आहेत. तर १० जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरात करोनाचे ४,३५,००२ रुग्ण आहेत. तर १९,६०७ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -