घरCORONA UPDATEकोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत चढ-उतार, कालपेक्षा आज १६ टक्क्यांनी वाढ

कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत चढ-उतार, कालपेक्षा आज १६ टक्क्यांनी वाढ

Subscribe

कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ४४,०८७,०३७ झाली. बुधवारी १७ हजार १३५ रुग्ण सापडले होते. त्यामुळे कालपेक्षा आज १६ टक्क्यांनी वाढ झाल्याने पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.

कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस चढ-उतार पाहायला मिळत आहे. देशभरात गेल्या २४ तासांत १९ हजार ८९३ नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. यामुळे कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ४४,०८७,०३७ झाली. बुधवारी १७ हजार १३५ रुग्ण सापडले होते. त्यामुळे कालपेक्षा आज १६ टक्क्यांनी वाढ झाल्याने पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. (New Corona patient increasing by 16 percent in India)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार देशात काल दिवसभरात ५३ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण ५ लाख २६ हजार ५३० लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, १ लाख ३६ हजार ४७८ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. म्हणजेच एकूण ०.३१ टक्के रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तसेच, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८.५० टक्के झाले आहे.

- Advertisement -

२०२० च्या ऑगस्ट महिन्यात अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या २० लाख होती. २३ ऑगस्ट २०२० रोजी ३० लाख आणि पाच सप्टेंबर २०२० रोजी ४० लाख होती. तर, १६ सप्टेंबर २०२० रोजी ५० लाख रुग्णांवर उपचार सुरू होते. हाच आकडा २० नोव्हेंबर रोजी ९० लाखांवर पोहोचला होता. दरम्यान, गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी कोरोना रुग्णांची संख्या तुलनेने फार कमी आहे. त्यामुळे कोरोना हळूहळू भारतातून काढता पाय घेत आहे.

 

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -