Sunday, May 9, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Corona Vaccine : अनेक राज्यात लसच उपलब्ध नाही, १ मे पासूनच्या तिसऱ्या...

Corona Vaccine : अनेक राज्यात लसच उपलब्ध नाही, १ मे पासूनच्या तिसऱ्या टप्प्याच्या लसीकरण मोहिमेवर प्रश्नचिन्ह

Related Story

- Advertisement -

देशात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने कोरोनाविरोधी लसीकरण मोहिम वेगाने सुरु आहे. त्यातच आता १ मेपासून १८ वर्षावरील सर्वांना लस देण्याची घोषणा केंद्राने केली. असे असतानाच अनेक राज्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिम बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान अनेक राज्यांनी लसीचा तुटवड्यामुळे १ मेपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिम राबवली जाणार नाही असे जाहीर केले. त्यामुळे देशभरात १ मे पासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या टप्प्याच्य लसीकरण मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. एकीकडे लशीच्या तुटवड्यामुळे लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ आली आहे तर दुसरीकडे व्यापक अशी मोहिम सुरु होतेय. लशीचा पुरेसा साठा, पुरवठा होत नसताना लसीकरण मोहिम कशी राबवायची असा प्रश्न राज्यांसमोर सध्या आहे.

‘या’ राज्यांमध्ये लसीकरण मोहिम थंडावली

मध्य प्रदेशमध्ये १ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोनाविरोधी लस मिळणार नसल्याचे तेथील राज्य सरकराने जाहीर केले. यावर बोलताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले की, आम्ही कोव्हिशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसी उपलब्ध करु देण्याची मागणी कंपनीकडे केली होती, परंतु त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, १ मेपर्यंत लसी डोस उपलब्ध होऊ शकणार नाही. त्यामुळे लस उपलब्ध झाल्या की लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु करता येईल.

- Advertisement -

दरम्यान गुजरातमध्येही हीच परिस्थिती आहे, यावर बोलताना गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी सांगतात, आम्ही १ मेपासून लसीकरण मोहिम सुरु करण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र अद्याप लसींचा साठा उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे लस उपलब्ध झाल्यानंतर १५ मेपासून संपूर्ण लसीकरण मोहिम सुरु होईल.

तसेच बिहारमध्येही १ मेपासून १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना लस देणे होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बिहारमध्येही लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा सुरु होणार नाही. लसीचा कमतरतेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यावर बोलताना बिहारमधील भाजपचे प्रवक्ते अरविंदकुमार सिंह म्हणाले की, १ मेपासून देशात लसीकरण मोहिम सुरु होणार होती मात्र त्यास उशीर होणार आहे. कारण केंद्र सरकार कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने यावर उपाययोजना करण्यात व्यस्त आहे.

दिल्ली, पंजाबसह ‘या’ राज्यात लसीची कमतरता

- Advertisement -

दिल्ली सरकारनेही लस नसल्याची अडचण नोंदविली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मुख्य अधिकाऱ्यांसह बैठक घेतल पुढील तीन महिने दिल्लीतील नागरिकांना सुरळीत लसी देण्याची योजना तयार केली आहे. याशिवाय पंजाब, ओडिशा, जम्मू-काश्मीर सरकारनेही 1 मेपासून नवीन तिसऱ्या टप्पातील लसीकरण मोहिम राबण्यात असमर्थता दर्शवली आहे.


 

- Advertisement -