जगात कोरोनाग्रस्तांचा आकडा १८ लाखाच्या वर; १ लाखाहून अधिक मृत्यू

जगात कोरोनातील मृतांचा आकडा सतत वाढत आहे. जगभरात एकूण १८ लाख ५६ हजार ७९८ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

world wide corona virus cases

जगात कोरोनाचा कहर अद्याप संपलेला नाही. चीनच्या वुहानपासून सुरू झालेल्या कोरोनाने संपूर्ण जगाला वेढलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक देश लॉकडाऊन आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगभरात एकूण १८ लाख ५६ हजार ७९८ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर आतापर्यंत १ लाख १४ हजार ३१२ लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत कोरोना संक्रमणाची संख्या झपाट्याने वाढली आहे आणि आता मृत्यूच्या बाबतीत इटलीला मागे टाकत आहे. इटलीमध्ये आतापर्यंत १९ हजाराहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेतील मृतांची संख्या २२,००० च्या वर

अमेरिकेत कोरोनाने अक्षरश: थैमान घातलं आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत रविवारी कोरोनामुळे १,५२८ लोकांचा बळी गेला आहे. अमेरिकेत ५ लाख ६० हजार ४३३ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे आणि आतापर्यंत २२ हजार ११५ लोक मरण पावले आहेत.

इटलीमधील कोरोनामुळे १९,००० हून अधिक मृत्यू

जगात अमेरिकेनंतर इटलीमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे आणि दररोज मृत्यूची संख्या वाढत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, इटलीमध्ये रविवारी ४३१ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि कोरोना विषाणूमुळे इटलीमध्ये मृत्यूची संख्या १९ हजार ८९९ वर पोहोचली आहे. इटलीमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या १ लाख ५६ हजार ३६३ झाली आहे.

स्पेनमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा १ लाख ६६ हजारा हून अधिक

युरोपियन देश स्पेनमध्ये कोरोना संसर्ग खूप वेगाने वाढला आहे. स्पेनमधील मृतांचा आकडा १७,२०९ वर पोहोचला आहे. रविवारी स्पेनमध्ये ६०३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ३,८०४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून संक्रमित लोकांची एकूण संख्या १ लाख ६६ हजार ८३१ पर्यंत पोहोचली आहे.

जगातील कोणत्या देशात आतापर्यंत किती मृत्यू

अमेरिका – २२,११५

इटली – १९,८९९

स्पेन – १७,२०९

फ्रान्स – १४,३९३

ब्रिटन – १०,६१२

इराण – ४,४७४

चीन – ३,३४१

बेल्जियम – ३,६००

जर्मनी – ३,०२२

नेदरलँड्स – २,७३७

ब्राझील – 1,223

तुर्की – १,१९८

स्वित्झर्लंड – १,१०६

स्वीडन – ८९९

पोर्तुगाल – ५०४

इंडोनेशिया – ३७३

ऑस्ट्रिया – ३५०

आयर्लंड – ३३४

रोमानिया – ३१८

भारत – ३३१