घरताज्या घडामोडीकडक सॅल्यूट! आईचे अंत्यसंस्कार उरकले अन् कोरोना योद्धा डॉक्टर पुन्हा ऑनड्युटी

कडक सॅल्यूट! आईचे अंत्यसंस्कार उरकले अन् कोरोना योद्धा डॉक्टर पुन्हा ऑनड्युटी

Subscribe

रुग्णांची सेवा करणे ही त्यांच्या आईसाठी खरी श्रद्धांजली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

कोरोनाच्या कठीण प्रसंगी डॉक्टर आपल्यासाठी देव बनले आहेत. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे कोरोना नामक विषाणूशी आपण दोन हात करु शकतो आहे. डॉक्टरांच्या जिद्दीची, त्याच्या संघर्षाच्या आजवर आपण अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. कोरोनाच्या काळातही डॉक्टरांना कोरोना योद्धा म्हणून संबोधण्यात आले. आपल्या आईचे अंत्यसंस्कार करुन कोरोना योद्धा डॉक्टर पुन्हा आपल्या सेवेसाठी रुजू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे डॉक्टरांविषयी आपल्याला असलेल्या आदर, सन्मान आखणी वाढवतो.

गुजरातच्या वडोदरा येथील सयाजी रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर राहुल परमार यांची आईचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांची आई गुजरातच्या गांधीनगर येथे राहत होती. त्यांच्या आजाराची बाती कळताच डॉक्टर राहुल आईला भेटण्यास गेले होते. आईचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी अंत्यसंस्काराच्या सर्व विधी पार पाडून दुसऱ्या दिवशी ते पुन्हा एकदा रुग्णालयात रुग्णांच्या सेवेसाठी रुजू झाले. रुग्णांची सेवा करणे ही त्यांच्या आईसाठी खरी श्रद्धांजली असल्याचे डॉक्टर राहुल सांगतात. संकटात असलेल्या कोरोना रुग्णांची सेवा करणे यासारखी दुसरी श्रद्धांजली माझ्या आईसाठी असू शकत नाही, असे त्यांनी सागितले.

- Advertisement -

डॉक्टर राहुल यांच्याप्रमाणेच सयाजी रुग्णालयात एसोसिएट प्रोफेसर असलेल्या डॉक्टर शिल्पा पटेल यांच्या आईचे देखिल काही दिवसांपूर्वी निधन झाले. मात्र त्या जराही डगमगून न जाता ६ तासांनी पुन्हा ऑनड्युटी आल्या. शिल्पा यांच्या आईला रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज होती. डॉक्टरांनी त्यांना रेमडेसिवीर आणण्यास सांगितले होते. मात्र त्यांना ते मिळू शकले नाही. त्यामुळे डॉक्टर शिल्पा यांना आपल्या आईचा जीव गमवावा लागला.

अशाप्रकारे रुग्णांच्या सेवेसाठी झोकून दिलेल्या सर्व डॉक्टरांना सलाम. कारण आज डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे अनेकांना जिवनदान मिळत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आता ताप नव्हे कोरोनाची ‘ही’ नवीन लक्षणे, वृद्धांपेक्षा तरूणाईत संक्रमण वाढतेय

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -