घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटब्रिटनला मोठा दिलासा! देशाच्या पंतप्रधानांची कोरोनापासून सुटका!

ब्रिटनला मोठा दिलासा! देशाच्या पंतप्रधानांची कोरोनापासून सुटका!

Subscribe

ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉनसन कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सोमवारपासून डॉउनिंग स्ट्रीट स्थित प्रधानमंत्री कार्यालयात कारभार साभांळणार आहेत. विदेश मंत्री डोमिनिक राब यांनी याची माहिती दिली. जॉनसन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर डोमिनिर राब कार्यभार सांभाळत होते.

त्यामुळे जॉनसन सध्या पुन्हा कार्यभार सांभाळण्यासाठी खूप उत्सुक आहेत. या विषयी डोमिनिर राब म्हणाले, जॉनसन यांच्या गैरहजेरीत कारभार सांभाळणं कठीण होतं.  मात्र सगळ्या टीममुळे शक्य झालं आहे. या बरोबर ते ही पुढे म्हणाले, या वर्षी ब्रिटेनमध्ये पुन्हा कोरोना येणं अशक्य आहे. विदेश मंत्री डोमिनक राब म्हणाले की, सरकारने गुरूवारी कोरोनाच्या चाचण्यांची संख्या वाढवली आहे. १ लाख कोरोना टेस्टचं लक्ष ठेवण्यात आलं आहे. कोरोनाची लस या वर्षी उपलब्ध होणार नाही. दोन दिवसांपूर्वी ब्रिटनमध्ये कोरोना लसीची पहिली मानवी चाचणी घेतली गेली.

- Advertisement -

कोरोनातून बरे झाल्यानंतर मुख्यमंत्री पीएम जॉनसन म्हणाले, मी लोकांशी हस्तांदोलन करणं नाही सोडणार. ते पुढे म्हणाले, मी एका रात्री हॉस्पिटलमध्ये होते, तेव्हा मी कोरोनारूग्णांबरोबर होतो. त्यामुळे प्रत्येकाला हस्तांदोलन केलं. तुम्हाला हे ऐकून आनंद होईल कारण मी यापुढेही हात मिळवतच राहेन.

बोरिस जॉनसनने २३ मार्च रोजी ब्रिटनमध्ये २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली आणि २६ मार्च रोजी ते स्वतः कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. त्यानंतर एप्रिलच्या सुरुवातीला त्याला सेंट थॉमस रुग्णालयात दाखल करावे लागले. जॉन्सन यांना १२ एप्रिलला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता. नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी कॅरी सायमंड्सला फोन करून जॉन्सन यांच्या प्रकृतीबद्दल विचारणा केली.

- Advertisement -

हे ही वाचा – Coronavirus – मालाडमध्ये कोरोनाला थोपवण्यात महापालिका यशस्वी!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -