घरCORONA UPDATECoronaVirus: देशभरात कोरोनाचा कहर, रुग्णसंख्या ५ हजाराच्या वर!

CoronaVirus: देशभरात कोरोनाचा कहर, रुग्णसंख्या ५ हजाराच्या वर!

Subscribe

भारतात कोरोना व्हायरसचे संकट अधिकच वाढत आहे. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहे. तसंच देशात दानशूर व्यक्ती देखील अनेक प्रकारची मदत करत आहेत. तरी देखील कोरोना प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. आतापर्यंत देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा ५ हजारहून अधिक झाला आहे. त्यामुळे संपूर्ण देशाच्या चिंतेत अधिकच भर पडत आहे.

इंडिया कोविड-१९ ट्रॅकरच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत भारतात कोरोनाचे ५ हजार १७२ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १५० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४२१ कोरोनाचे रुग्ण हे रिकव्हर झाले आहेत. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या १०१८वर पोहोचली आहे. महाराष्ट्रानंतर तमिळनाडूनमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

- Advertisement -

‘या’ राज्यात कोरोनाचे फैलाव नाही

देशभरात कोरोनाचा फैलाव वाढत असला तरी सिक्किम, नागालँड आणि मेघायल या तीन राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळले नाही आहेत.

आतापर्यंत देशभरातील कोरोनाची आकडेवारी

महाराष्ट्र – १०१८
तमिळनाडू – ६९०
दिल्ली – ५२५
तेलंगणा – ३६४
केरळ – ३३६
राजस्थान – ३२८
उत्तर प्रदेश – ३०५
आंध्रप्रदेश – ३०४
मध्यप्रदेश – २६८
कर्नाटक – १७५
गुजरात – १७५
हरयाणा – १४३
जम्मू-काश्मीर – १२५
पंजाब – ९९
पश्चिम बंगाल – ९१
ओडिसा – ४२
बिहार – ३४
उत्तराखंड – ३१
आसाम – २७
हिमाचल प्रदेश – १८
लडाख – १४
चंदीगढ – १०
अंदमान-निकोबार – १०
छत्तीसगड – १०
गोवा – ७
पाँड्युचेरी – ५
झारखंड – ४
मनिपुर – २
त्रिपुरा – १
मिझोरमा – १
दादरा अंद नगर हवेली – १
अरुणाचल प्रदेश – १
एकूण – ५१७२

- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus: २४ तासात लपलेल्या तबलीग सदस्यांनी पोलिसांना शरण जा!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -