घरट्रेंडिंगभयावह! इटलीत ५९८६ नवीन करोना रूग्ण हॉस्पिटलेमध्ये दाखल!

भयावह! इटलीत ५९८६ नवीन करोना रूग्ण हॉस्पिटलेमध्ये दाखल!

Subscribe

दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग जगभर वाढत चालला आहे. चीन एवढाच करोनाचा फटका इतर ९०हून अधिक देशांना बसला आहे. चीनबरोबर इटलीला करोनाचा सर्वाधीक बसला आहे. करोनामुळे चीनपेक्षाही सर्वाधिक मृतांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासात इटलीत ६२७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ५९८६ नवीन रूग्ण हॉस्पिटलेमध्ये दाखल झाले आहेत.

इटलीत भयावह स्थिती निर्माण झाली आहे. मागील २४ तास इटलीमध्ये करोनाने संपूर्ण इटली हादरली. इटलीत एकाच दिवसांत ५९८६ नवे रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली असून जगभरात चिंतेचे वातावरण आहे. करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ४७ हजार २१ इतकी झाली आहे. तर, मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. इटलीत करोनाच्या संसर्गामुळे ४०३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २६५५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

- Advertisement -

करोनामुळे ५१२९ जाणांवर उपचार सुरू आहेत. या सगळ्यांनी करोनावर मात केली आहे. मात्र, इटलीत रुग्ण आणि मृत्यूंचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. चीन व इटलीमध्ये करोनाच्या संसर्गामूळे सर्वाधिक मृत्यू हे वृद्धांचे झाले आहेत. चीनमध्ये करोनावर नियंत्रण मिळवले असल्याचे सध्या चित्र आहे. चीनमध्ये नवीन करोनाबाधित रुग्णांची संख्या कमालीची घटली आहे.

भारतात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 22 मार्चला जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले. त्या पार्श्वभूमीवर पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या सुमारे २४०० लांब पल्ल्याच्या गाड्या एक दिवसाठी रद्द करण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -