Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE करोनाला हरवणे शक्य; १ लाख रुग्णांनी केली करोनावर यशस्वी मात

करोनाला हरवणे शक्य; १ लाख रुग्णांनी केली करोनावर यशस्वी मात

करोना विषाणूवर मात करणे आता शक्य झाले असून १ लाख रुग्णांनी या विषाणूवर मात केली आहे.

Related Story

- Advertisement -

करोनाच्या प्रसारामुळे जगभरात अक्षरश: हाहाकार झाला आहे. जगभरात करोनाची चिंता दिवसेंदिवस वाढत असताना दिसत आहे. दरम्यान, इटलीमध्ये तर करोनाने थैमान घातले आहे. तर दुसरीकडे स्पेन, अमेरिकेतही करोनाचा वाढता संसर्ग आणि मृतांची आकडेवारी पाहून प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण झाली आहे. मात्र, आता या करोना विषाणूवर मात करणे अशक्य नाही तर शक्य झाले आहे.

मृत्यूचे प्रमाण कमी

जगभरात थैमान घातलेल्या करोनावर आता मात करणे शक्य झाल्याचे दिसून येत आहे. कारण करोनाच्या संसर्गबाधित रुग्ण आणि मृत्यूंचे प्रमाण कमी झाले आहे. करोना रुग्णांच्या आकडेवारीबाबत माहिती देणाऱ्या वर्ल्डोमीटर या संकेतस्थानुसार, बुधवारी सायंकाळपर्यंत ४ लाख ३६ हजार ८१३ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी १९ हजार ६३७ जणांचा करोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे. तर, २ लाख ९२ हजार ४३ जणांवर उपचार सुरू असून १३ हजार २५५ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. मात्र, त्याचवेळेस तब्बल एक लाख ११ हजार ८७८ जणांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. करोनावर अद्याप कोणतेही औषध नसून संशोधन सुरू आहे.

- Advertisement -

चीनमधील वुहान येथून करोनाचा प्रसार झाला आहे. त्यानंतर या व्हायरसची लागण इतर देशांना देखील झाली. सध्या इतर देश देखील या विळख्यात अडकले आहेत. मात्र, आता चीनने या करोना विषाणूवर मात केली आहे. वुहानमध्ये आजपासून बससेवा सुरु करण्यात आली आहे. सध्या करोनाच्या संसर्गाचे केंद्र युरोप असून युरोपीन देशांना याचा मोठा फटका बसत आहे. यापार्श्वभूमीवर करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सुमारे ५० देशांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.


हेही वाचा – १०० देश, २० व्हिडिओ कॉन्फरन्स, चीन शिकवतोय जगाला धडा!


- Advertisement -